मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील संशयीत वाल्मीक कराड हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा ‘खास’ माणूस आहे. मुंडे हे महायुती सरकारमध्ये मंत्री असल्याने कराड याची दबावाशिवाय पोलीस चौकशी होणार नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा तत्काळ घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फरार असलेला वाल्मीक कराड हा मंगळवारी पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाकडे शरण आला. त्यानंतर आव्हाड यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मुंडे यांच्या राजीनाम्याची आमच्या पक्षाची मुख्य मागणी आहे. मात्र आम्ही ती मुख्यमंत्र्यांकडे करणार नाही. अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या पक्षाचे मुंडे हे मंत्री आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची जबाबदारी अजित पवार यांचीच आहे, असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा…वजनदार पत्र्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहने पंक्चर, २० हून अधिक गाड्या पडल्या बंद

उपमुख्यमंत्री अजित पवार याप्रकरणी गप्प आहेत. खरे तर गप्प राहणे हा त्यांचा स्वभाव नाही. पवार यांनी याप्रकरणी बोलावे, अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. जरी मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद दिले नाही तरी ते मंत्रीपदी तर आहेतच. मंत्र्यांच्या खास माणसाची नि:ष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. मंत्र्याचा पोलीस प्रशासनावर दबाव राहणाराच. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे, असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा…मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पास गती देण्याचे आदेश

‘आका’चा करिष्मा?

वाल्मीक कराड याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. देशमुख कुटुंबीयांनी तशी न्यायालयात याचिका केली आहे. पोलिसांनी जाणीपूर्वक वाल्मीक कराड यांचे नाव हत्येच्या गुन्ह्यातून वगळले आहे. हा सर्व वाल्मीक याचा ‘आका’ धनंजय मुंडे याचाच करिष्मा आहे, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awad demanded deputy cm ajit pawar resign from dhananjay munde s position immediately mumbai print news sud 02