मुंबई : सुमारे सात लाख कोटींच्या अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी १ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम विकास कामे किंवा अन्य कामांसाठी खर्च केली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

● महिला व बालविकास खात्यासाठी सर्वाधिक ३१,९०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील बहुतांशी रक्कम ही लाडकी बहीण योजनेसाठी खर्च होईल. सार्वजनिक बांधकाम रक्कम ही ठेकेदारांची रखडलेली बिले चुकती करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. बहुतेक विभागांसाठी चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत साधारणपणे सारखीच किंवा काही खात्यांच्या तरतुदीत कपात करण्यात आली आहे.

● ऊर्जा (२१,५३४ कोटी), ●सार्वजनिक बांधकाम (१९,०७९ कोटी), ●जलसंपदा (१५,९३२कोटी), ● ग्रामविकास (११,४८० कोटी), ● नगरविकास (१०,६२९ कोटी), ● कृषी (९,७१० कोटी), ● नियोजन (९०६०कोटी), ● इतर मागास बहुजन कल्याण (४३६८कोटी), ● मृद व जलसंधारण (४२४७कोटी), ● पाणीपुरवठा (३८७५कोटी), ● सार्वजनिक आरोग्य (३८२७कोटी), ● परिवहन (३६१० कोटी), ● शालेय शिक्षण (२९५९ कोटी), ● सामाजिक न्याय (२९२३ कोटी), ● वैद्याकीय शिक्षण (२५१७ कोटी), ● वने (२५०७ कोटी), ●गृह (२२३७ कोटी), ● रोजगार हमी योजना (२२०५ कोटी), ●उच्च शिक्षण (८१० कोटी), ● विधिमंडळ सचिवालय (५४७ कोटी) ● पर्यटन (१९७३ कोटी).

नवी मुंबई विमानतळ पुढील महिन्यात सुरू

बहुप्रतिक्षित नवी मुंबई विमानतळावरून पहिले विमानोड्डाण एप्रिल महिन्यात होईल, असा विश्वास अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला. प्रारंभी या विमानतळावरून केवळ देशांर्तगत विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानतळाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून विविध चाचण्या यशस्वी ठरलेल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra budget 2025 provision for different departments css