मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी ( एमसीए ) आज ( २० ऑक्टोंबर ) निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा ‘सामना’ रंगत आहे. एमसीएच्या निवडणुकीसाठी ३८० मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे यांच्यात रंगेलल्या या निवडणुकीसाठी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर शरद पवार- आशिष शेलार पॅनल नक्की विजयी होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रताप सरनाईक म्हणाले, “एमसीएच्या निवडणुकीला फार महत्व दिलं जाते. या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा होत्या. कारण, शरद पवार, आशिष शेलार, जितेंद्र आव्हाड आणि मी एकत्र पॅनल घेऊन निवडणुकीसाठी उतरलो होते. शरद पवार हे एमसीएचे भीष्मपिता समजले जातात. त्यांनी आशीर्वाद दिलेले उमेदवार निवडून येतात, हा इतिहास आहे. आमचेही उमेदवार प्रचंड बहूमताने निवडून येतील.”

हेही वाचा : शरद पवारांनी आशिष शेलारांबरोबर युती का केली?, संदीप पाटील म्हणाले…

एमसीए निवडणुकीसाठी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा संशय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला होता. त्यावर सरनाईक यांनी म्हटलं, “नाना पटोले यांचा क्रिकेटशी किती संबंध आहे, याची कल्पना नाही. ते माझे जवळचे मित्र आहेत. रमेश लटके हे माझे सहकारी होते. त्यांच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केली होती,” असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. ते ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca election sharad pawar ashish shelar panel win say pratap sarnaik ssa