आर्यन खानच्या अपहरणासाठी कट रचल्याच्या आरोपांवर मोहित कम्बोज यांचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर; म्हणाले…

सुनील पाटील नवाब मलिकांचा मित्र आहे हे सुद्धा समोर येईल असेही मोहित कम्बोज म्हणाले.

Mohit Kamboj reply to Nawab Malik on allegations of conspiracy to kidnap Aryan Khan

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांनी आता भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंम्बोज यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मोहित कम्बोज या प्रकरणाचा सूत्रधार असून कंम्बोज हा वानखेडेचा साथीदार आहे असे मलिक यांनी म्हटले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुनील पाटील आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांचे आरोप फेटाळून लावत पाटील यांचा राष्ट्रवादीशी कोणताही संबंध नाही किंवा त्यांची कधी भेटही झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता मोहित कम्बोज यांनी या आरोपांना प्रत्तुत्तर दिले आहे.

“नवाब मलिक यांनी ज्या हॉटेल व्यवसायाचा उल्लेख केला आहे तो माझा नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत. ते दुसऱ्यांचे व्यवसाय माझे असल्याचे सांगत आहेत. सुनील पाटीलसोबत बोलणे झाल्याचे त्यांनी मान्य केले. जसे जसे त्यांच्याबाबत खुलासे होत आहेत तसे ते खोटे आरोप करत आहेत. त्यांनी ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मी २०१४ साली निवडणूक लढलो. ३५० कोटींची संपत्ती असल्याचे मी स्वतः सांगितले. मी कोणता घोटाळा केला आहे याची माहिती घेऊन या. मी वर्षाला पाच कोटींचा कर भरतो. मी मलिक आणि त्यांच्या मुलांप्रमाणे काही लपवत नाही. हे आरोप करुन ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी तुम्हाला घाबरत नाही,” असे मोहित कम्बोज म्हणाले.

ऋषभ सचदेवा आणि अन्य लोकांनी आर्यनला क्रूझवर बोलवले होते असा आरोप लावण्यात येत आहे असे विचारले असता मोहित कम्बोज यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “एका महिन्यापूर्वी त्यांनी आरोप केल्यानंतर त्याच्यावर मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. जेवढे ते आरोप लावत आहेत त्याच्याविरुद्ध मी हायकोर्टात जाणार आहे. त्यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूझाचे काय संबंध आहेत ते लोकांना सांगावेत. मलिक गोष्टी लपवत आहेत. या गोष्टीपासून लांब पळण्यासाठी एखाद्यावर वैयक्तिक आरोप ते करत आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले होते,” असे मोहित कम्बोज म्हणाले.

नवाब मलिक ललीत हॉटेलबाबत गोष्टी मान्य करतील. सुनील पाटील यांच्यासोबत त्यांचे २० वर्षापासून संबंध आहेत हे सुद्धा समोर येणार आहे असेही कम्बोज म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mohit kamboj reply to nawab malik on allegations of conspiracy to kidnap aryan khan abn

Next Story
तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? – संजय राऊत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी