मुंबई – मालवणी परिसरातील ४० वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याप्रकरणी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीविरोधात मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने पीडित महिलेवर अत्यााचर करून त्याचे चित्रीकरण केले होते. तसेच तिच्या दोन अल्पवयीन मुलींचाही विनयभंग केला होता. आरोपीने पीडितेकडून पैसे घेतले आणि नंतर ते परत देण्यास नकार दिला. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद असून, पीडित महिलेने अखेर ५ जुलै रोजी मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या प्रकरणात आरोपीच्या बहिणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने पीडित महिलेला धमकावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी संबंधित गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.