Mumbai, Pune , Nagpur Breaking News Updates, 05 August 2025 : देशातील ‘रिपाइं’च्या ऐक्यासाठी व दलित एकजुटीसाठी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व ‘बसप’ अध्यक्षा मायावती यांनी ‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’चे नेतृत्व करावे, असे आवाहन ‘रिपाइं’ अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच बहुप्रतिक्षित अजनी-पुणे स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे, याच महिन्यात तिचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. अशा विविध क्षेत्रातील मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi : महत्त्वाच्या घडामोडींची माहिती एका क्लिकवर…
कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई निळजे उड्डाण पुलावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण
वांद्रे, जोगेश्वरीतील दोन अपघांमध्ये दुचाकीवरील तीन महाविद्यालयीन तरुण जखमी
बनावट आधारकार्ड, बँक खात्याचा आधार घेऊन कामगारांच्या नावे अर्ज ? म्हाडाच्या नावाने गिरणी कामगारांची फसवणूक
१४ लाखांची एमडी जप्त, महिलेवर गुन्हा दाखल; नालासोपाऱ्याहून उल्हासनगरात अमली पदार्थांचा पुरवठा ?
ठाण्याच्या या प्रतिष्ठित शहरी हरितक्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता
‘रिपाइं’ ऐक्यासाठी मायावतींनी नेतृत्व करावे; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
देशातील ‘रिपाइं’च्या ऐक्यासाठी व दलित एकजुटीसाठी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व ‘बसप’ अध्यक्षा मायावती यांनी ‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’चे नेतृत्व करावे, असे आवाहन ‘रिपाइं’ अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
रिक्षा-टॅक्सी चालक उद्धट; रपिडो बाईक-टॅक्सीच्या विरोधावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले
रिक्षाचालक ग्राहकांना जी वागणूक देतात, त्यांच्याशी जे वर्तन करतात ते आणि त्यांचा उद्धटपणा आम्हाला चांगलाच ठाऊक आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी रॅपिडो बाईक टॅक्सीच्या विरोधात याचिका करणाऱ्या रिक्षाचालकांचा समाचार घेतला. त्यानंतर, रिक्षा चालकांनी याचिका मागे घेतली. सविस्तर वाचा…
कबुतरखान्यावरुन उफाळलेला वाद शमवण्यासाठी कबुतरखाने शहरापासून दूर स्थलांतरित करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र शहराबाहेरील जागांमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीचाही समावेश आहे. या सूचनेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. सविस्तर वाचा…
खासदार- आमदारांविरोधातील खटल्यांबाबत उच्च न्यायालय काय म्हणाले?
राज्यातील खासदार आणि आमदारांविरुद्ध खटल्यांना होणारा विलंब विचारात घेऊन हे खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाने सर्व निबंधक आणि कनिष्ठ न्यायालयांना राज्य सरकारनियुक्त समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचा…
मुंबई पुणे नागपूर न्यूज