Mumbai News Updates, 22 July 2025 : सतत शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने केल्याने वादग्रस्त ठरलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आता विधान परिषदेत ऑनलाइन पत्ते खेळत असल्याच्या चित्रफितीवरून अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली नाराजी, तर पक्ष त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेईल ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका यातून कोकाटे यांची गच्छंती अटळ मानली जाते.

दरम्यान, केरळमधील कोची येथून आलेले एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरताना घसरले. विमानाचे तीन टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे विमानाचे इंजिन क्राऊलिंग, एका विंगचा फ्लॅप आणि नोज व्हील एरिया याचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत प्रवासी थोडक्यात वाचले. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates in Marathi

12:34 (IST) 22 Jul 2025

खळबळजनक! तरुणींचे फोटो सोशल मीडियावर टाकून पुरुषांना करायचे आकर्षित; दोन ते पाच हजारात…

देहव्यापार सध्या खूप फोफावत चालला आहे. समाज माध्यमातून त्याला चालना मिळते. अकोल्यात समाज माध्यमाद्वारे देहव्यापार चालवला जात असल्याचा खळबळजनक प्रकार पोलीस कारवाईत उघडकीस आला आहे. …सविस्तर वाचा
12:31 (IST) 22 Jul 2025

वसईच्या कळंब समुद्र किनारी आढळला कंटेनर; पोलिसांकडून तपास सुरू

मंगळवारी सकाळी या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा कंटनेर वाहून आल्याचे नागरिकांना दिसून आले आहे. …सविस्तर बातमी
12:30 (IST) 22 Jul 2025

डोंबिवलीतील रिक्षा चालकाच्या आत्महत्येप्रकरणी मोठागावमधील मोटार चालकावर गुन्हा

ज्योती शेळके यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सासरे मुंजाजी शेळके सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत डोंबिवली रेल्वे स्थानक भागात प्रवासी वाहतूक करायचे. …सविस्तर बातमी
12:15 (IST) 22 Jul 2025

खारघर येथील चोरीचे सत्र थांबेना…

खारघर उपनगरात जुलै महिन्यात एका रात्री तब्बल ९ ठिकाणी झालेल्या घरफोडीनंतर खारघरच्या सूरक्षेविषयीचा प्रश्न पावसाळी आधिवेशनात भाजपच्या आमदारांनी मांडला. …सविस्तर वाचा
12:12 (IST) 22 Jul 2025

‘यूजीसी’चा मोठा निर्णय, प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे काय होणार?

गुणवत्तापूर्ण संशोधनपत्रिकांची ‘यूजीसी केअर’ ही यादी रद्द करण्याच्या निर्णयावर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) शिक्कामोर्तब झाले आहे. …अधिक वाचा
12:11 (IST) 22 Jul 2025

कुर्ला मदर डेअरी भूखंडाबाबत निर्णय रद्द करा, रहिवाशांचे मुख्यमंत्र्यांना साकडे; भेटीसाठी वेळ देण्याची मागणी

कुर्ला मदर डेअरी भूखंडाबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी एका पत्राद्वेर लोक चळवळीने मुख्यमंत्र्यांना केली आहे. …सविस्तर बातमी
12:00 (IST) 22 Jul 2025

‘वृक्ष गजानन’ संकल्पनेला नवी मुंबईत उदंड प्रतिसाद; पर्यावरणपूरक मूर्तीला वेगळा पर्याय

यंदा नवी मुंबईत सुमारे २०० ते २५० वृक्ष गणेशमूर्ती विक्रीसाठी तयार करण्यात आल्या असून, नागरिकांचा या संकल्पनेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मूर्ती विक्रेते सांगत आहेत. …सविस्तर वाचा
11:56 (IST) 22 Jul 2025

जैन मंदिरावरील कारवाई प्रकरणातील सहाय्यक आयुक्तांना अखेर बढती

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १ एप्रिल २०२५ रोजी कार्यकारी अभियंता नवनाथ सोपानराव घाडगे यांची के / पूर्व विभागाचे ‘सहायक आयुक्त’ म्हणून नेमणूक केली होती. …सविस्तर बातमी
11:47 (IST) 22 Jul 2025

मुंबई विमानतळावरून ७ कोटींच्या हायड्रोपोनिक गांजासह प्रतिबंधीत औषधे जप्त

पहिल्या कारवाईत संशयाच्या आधारावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवले. …सविस्तर बातमी
11:43 (IST) 22 Jul 2025

चार दिवसांत १३.१६ कोटींची करवसुली; पनवेलकरांचा अभय योजनेला प्रतिसाद

भाजपचे माजी नगरसेवकांनी १८ जुलै रोजी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने १५ ऑगस्टपर्यंत कर भरल्यास ९० टक्के शास्ती सवलतीची अभय योजना जाहीर केली होती. …वाचा सविस्तर
11:39 (IST) 22 Jul 2025

धक्कादायक! बनावट नोटा चलनात; तुमच्याकडची ५०० रुपयांची नोट…

बनावट नोटा चलनात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ५०० रुपयांच्या दोन नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. …वाचा सविस्तर
11:26 (IST) 22 Jul 2025

कोकणवासीयांसाठी शुभवार्ता… ‘रोल-ऑन रोल-ऑफ’मुळे कोकणवासीयांचा गणेशोत्सवातील प्रवास खड्डेमुक्त होणार…

रो-रोची सेवा २३ ऑगस्टपासून सुरू होत असून यासाठी २१ जुलै रोजीपासून आरक्षण सुरू झाले आहे. …सविस्तर वाचा
11:24 (IST) 22 Jul 2025

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक; जळगाव जिल्ह्यात हरकतींचा पाऊस

प्राप्त हरकती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अभिप्राय दिल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय महसूल आयुक्तांकडे २८ जुलैपर्यंत सादर केला जाईल. …सविस्तर बातमी
11:21 (IST) 22 Jul 2025

पुनर्वसनासाठी शेवा कोळीवाड्यातील महिला आक्रमक; चौथ्यांदा जेएनपीएची जहाजे रोखण्याचा इशारा

जेएनपीए बंदराच्या उभारणीसाठी १९८५ ला शेवा कोळीवाडा गावाचे विस्थापन केले होते. या संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना धोकादायक घरात आपल्या कुटुंबासह जीवन जगावे लागत आहे. …अधिक वाचा
11:16 (IST) 22 Jul 2025

प्रोस्टेट कॅन्सर अलर्ट! ५० वर्षांखालील व्यक्तींमध्येही लक्षणे! मोफत व सक्तीची चाचणी गरजेची…

ग्लोबोकॉन २०२३च्या जागतिक अहवालानुसार प्रोस्टेट कॅन्सर भारतात पुरुषांमध्ये सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. …सविस्तर बातमी
11:02 (IST) 22 Jul 2025

मुंबई : विमानात धूम्रपान, प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल

नियमानुसार विमान सुरू होण्याआधी आणि विमान सुरू असताना विमानात धूम्रपान करण्यास बंदी आहे. तशी माहिती प्रवाशांना वेळोवेळी दिली जाते.

सविस्तर वाचा…

10:49 (IST) 22 Jul 2025

पनवेलच्या उपनिरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (वर्ग-२) सचिन वामन वाईकर याला सोमवारी रात्री साडेदहा वाजता ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अटक केली. …वाचा सविस्तर
10:34 (IST) 22 Jul 2025

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी चालकांच्या मागण्यांवर आज निर्णय, आरटीओ आणि ॲप आधारित चालकांची बैठक पार पडणार

ॲप आधारित टॅक्सी-रिक्षा चालकांनी १५ जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. परंतु, हातावर पोट असलेल्या चालकांच्या कुटुंबाला आंदोलनाची झळ बसू लागली.

सविस्तर वाचा…

10:33 (IST) 22 Jul 2025

आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरण; दाक्षिणात्य समाजाची माफी मागावी – तुलुनाडू शेट्टी समाजाची मागणी

काही दिवसांपूर्वी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहातून गायकवाड यांनी जेवण मागवले होते.

सविस्तर वाचा…

10:32 (IST) 22 Jul 2025

एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले; चाक फुटल्याने मुंबई विमानतळावर अपघात

या घटनेमुळे विमानाचे इंजिन क्राऊलिंग, एका विंगचा फ्लॅप आणि नोज व्हील एरिया याचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत प्रवासी थोडक्यात वाचले.

सविस्तर वाचा…

10:31 (IST) 22 Jul 2025

कृषिमंत्री कोकाटे यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांसह पक्षाचीही नाराजी

कोकाटे यांनी आपण पत्ते खेळत नव्हतो, असा खुलासा केला असला तरी एकूण तीन चित्रफितींवरून कोकाटे हे विधान परिषद सभागृहात रमी खेळत असल्याचे स्पष्ट होते.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २२ जुलै २०२५