Mumbai Live Updates, 25 July 2025 : मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पहाटेपासून अनेक भागात संततधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.शहर आणि उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शहरातील परळ, कुलाबा, वरळी भागात पावसाचा जोर वाढला आहे. उपनगरातील वांद्रे, अंधेरी परिसरात देखील पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली नापसंती तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढील आठवड्यात चर्चा केल्यावर निर्णय घेण्याची घेतलेली भूमिका यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येणार की त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार याचीच आता चर्चा सुरू झाली आहे.विधान परिषद सभागृहाचे कामकाज सुरू असतामा भ्रमणध्वनीवर कोकाटे हे रमी खेळत असल्याच्या चित्रफीती समोर आल्या. त्यावरून विरोधकांनी कोकाटे यांची कोंडी केली आहे. त्यातचट कोकाटे यांनी सरकारला भिकाऱ्याची उपमा दिली. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घडामोडींसह मुंबई, मुंबई महानगर, नागपूर आणि पुणे शहर परिसरातील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या…
Pune Nagpur Mumbai Breaking News Live Updates in Marathi
महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कुठे आहे? तिथे कसे पोहोचाल? जाणून घ्या…
‘बीज राखी’चा नवा ट्रेंड; पर्यावरणपूरक सणासोबत महिलांना रोजगार
कृषिमंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार का ?
कृषिमंत्री कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार का ?
Mumbai Heavy Rain Alert: मुंबईत पावसाने जोर धरला, पहाटेपासून अनेक भागांत संततधार; तर ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ९० हजार ५०० रुपये किमतीचे ब्राऊन हेरॉईन पकडले
रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; कर्जत, खालापूर, माणगाव, पोलादपूर तालुक्यांना तडाखा
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २५ जुलै २०२५