Maharashtra Rain Updates : मुंबईत सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय झाली. दरम्यान, मंगळवारी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच, हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केल्याच्या दिवशी वैष्णवीला सासरकडील लोकांकडून मारहाण झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
Mumbai Pune Nagpur Breaking News Updates, 27 May 2025
शहरबात : बंदी सुरू होण्यापूर्वीच मासेमारी हंगाम संपले
नीलेश वाघमारेचे गोव्यात दोन ‘रिसॉर्ट’, बार आणि कोट्यवधींची माया…
नितीन गडकरी @६८ : भिंती रंगवण्यापासून ते रोडकरीपर्यंतचा संघर्षमय प्रवास…
प्रेमात अडसर बनलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, दोन तासांत गुन्हा उघड करण्यास पोलिसांना यश
कल्याण रेल्वे स्थानकात गुजरातच्या तस्कराकडून आठ किलोचे अंमली पदार्थ जप्त
पाय जमिनीवर असणे म्हणजे काय…, पद्मश्रीप्राप्त चैत्राम पवार यांचा साधेपणा
एपीएमसीत नालेसफाईचा फज्जा
पनवेलमध्ये करोनाचे तीन रुग्ण, पालिका प्रशासन सज्ज
सलग दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद, रायगड जिल्ह्यात २४ तासात सरासरी १६० मिलीमीटर पाऊस
मुंबई : समुद्रावर जाताय, सांभाळा… आज दुपारी मोठी भरती… चार मीटर उंच लाटा उसळणार…
३५ देश, ४ आंतरराष्ट्रीय संस्थांसह ‘ हे ‘ वैद्यकीय शिक्षणात हे आंतरखंडीय केंद्र
कौटुंबिक वादातील भरडल्या जाणाऱ्या मुलांसाठी स्वतंत्र वकील द्या, जनहित याचिकेद्वारे मागणी
वाळूजमध्ये सराईत संशयित गुन्हेगाराचा एन्काऊंटर
नवी मुंबई : बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई, २ हजार १४२ रिक्षाचालकांकडून तीन लाखांचा दंड वसूल
देहूरोड पोलीस आणि चोरटे आमनेसामने; फिल्मीस्टाईल धरपकड, दोघांना बेड्या
देवदर्शनाला गेलेल्या गुहागरातील तरुणाचा लोणावळ्यात खून; नऊ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई : महाविद्यालयीन प्रवेशाची प्रतीक्षा करताय… प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी
मिरा भाईंदरच्या मीठ उत्पादनावर ‘ओला दुष्काळ’, मीठ उत्पादनात ६६ टक्के घट, मिठागरे बंद करण्याची वेळ
शहरबात: शहराला अमली पदार्थाचा विळखा
पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था; लोणेरे, टेमपाले, कोलाड येथील सर्व्हीस रोड खड्ड्यात
Dhule Solapur Highway Accident Updates: छत्रपती संभाजीनगर : गेवराईजवळ मालमोटारीने सहा जणांना चिरडले
बाळासाहेब आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सुरय्या, भागवत परळकर व सचिन ननवरे, अशी मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली.
सायकल ट्रॅकवर नालेसफाईचा गाळ, फेरफटका मारणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय
Nashik Onion Farmers Loss: नाशिकमध्ये आतापर्यंत तीन हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान, शासकीय निकषामुळे भरपाईत अडथळे
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे