Pune Breaking News Updates: राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये अद्याप ही राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे फरार आहेत. शशांक, करिष्मा आणि लता यांना न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडी पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तेव्हा मुंबई, मुंबई महानगर, पुणे आणि परिसर तसंच नागपूर शहरातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 21 may 2025

11:54 (IST) 21 May 2025

मुख्यमंत्र्यांच्या शहरात १३ वर्षांनंतरही २४ तास पाणी नाही?

नागपूरकरांना २४ तास स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल, असे स्वप्न दाखवून विश्वराज इन्फ्रा व वीओलिया यांची संयुक्त कंपनी असलेल्या ओसीडब्ल्यूला कंत्राट देण्यात आले. त्यासाठी महापालिकेने ३,२५० कोटी रुपये खर्च केले. …अधिक वाचा
11:46 (IST) 21 May 2025

पुण्यात बंद सदनिकांची पाहणी करून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

पुणे शहरातील विविध भागांमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल १९ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. बंद सदनिकांचे कुलूप तोडून चोरटे दागिने, रोकड आणि लॅपटॉप लंपास करत आहेत. पोलिसांकडून तपास सुरू आहे. …वाचा सविस्तर
11:21 (IST) 21 May 2025

‘ती’ एकटक पाडलेल्या बंगल्याला पाहात होती; “आमची फसवणूक झाली..”

पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात इंद्रायणी नदीच्या निळ्या पुररेषेत येणारे ३६ बंगले पाडल्यानंतर नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आयटी अभियंत्याचा देखील बंगला यामध्ये उद्ध्वस्त झाला असून, फसवणुकीचा आरोप बिल्डरवर करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
10:40 (IST) 21 May 2025

लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता सरकारने आणली आणखी एक मोफत योजना, ९० टक्के अनुदानावर…

महायुतीच्या यशामागे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यशस्वी प्रचार आणि महिला मतदारांवर त्याचा दिसून आलेला सकारात्मक प्रभाव असल्याचे जाणकार सांगतात. …सविस्तर बातमी