उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था म्हणणाऱ्या गुलाबरावांना राऊतांचं उत्तर, म्हणाले “ते काही दुधखुळे…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना जोरदार उत्तर दिलंय.

Sanjay Raut Gulabrao Patil Uddhav Thackeray
संजय राऊत, गुलाबराव पाटील व उद्धव ठाकरे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना जोरदार उत्तर दिलंय. “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच ते कालपर्यंत सत्तेत होते. उद्धव ठाकरे काही दुधखळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (५ जुलै) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत.”

“उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव”

“उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचं असतं तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही निघून गेलात, तर ठीक आहे, पण आता कारणं सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचं काम करा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

पाहा व्हिडीओ –

आदित्य ठाकरे सोडून १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस, राऊत म्हणाले…

शिंदे गटाकडून आलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले, “ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊ द्या. आदित्य ठाकरे यांना सोडून का नोटीस दिल्या हे मला माहिती नाही. जे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने आदित्य ठाकरे यांना नोटीस दिली नाही त्यांनी लक्षात ठेवावं जे इतर १४ आमदार आहेत तेही बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहेत.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut react on rebel mla gulabrao patil over remark on uddhav thackeray pbs

Next Story
गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या ८५० गाड्यांचे आरक्षण; परतीच्या प्रवासाचे आरक्षणही सुरू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी