मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हटले जाते. पण हे कसले चाणक्य ? भाजप एवढी महाशक्ती आहे मग शिवसेना आणि राष्ट्रवादीतून फडणवीसांना उचलेगिरी कशासाठी करावी लागते, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा सापडला. हे पाहता राज्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे हे स्पष्ट होते, अशी टीका अंधारे यांनी केली. नाशिकला जर शेकडो कोटींचे अंमली पदार्थ सापडत असेल तर जिल्ह्याचे पालकमंत्री काय करत आहेत? असे सांगताना अंधारे यांनी दादा भुसे यांना लक्ष्य केले.

हेही वाचा >>> “यंदाच्या दसरा मेळाव्यात ती खुर्ची रिकामी नसणार”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

हसन मुश्रीफ यांनी कालच कोल्हापूरात संगितले आहे. भाजप मला तुरुंगात टाकणार होते. मी भाजपबरोबर गेलो. एकनाथ शिंदे हाच एक घोटाळा आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.  दादा भुसे यांनी १७८ कोटींचा शेतकरी घोटाळा,उदय सामंत यांचा रत्नागिरी येथील १०० कोटींचा डांबर घोटाळा. हे भाजपचे सरकार वाघनखांचा घोटाळा करतेय. हीच वाघनखे भाजपचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.

सत्ताधाऱ्यांना घरी बसायचे आहे. निवडणुकीची देखील गरज भासणार नाही. त्यापूर्वी हे लोक घरी बसणार आहेत,असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारच्या मागे महाशक्ती आहे मग सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही, असा सवाल नितीन बानुगडे-पाटील यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubt leader sushma andhare slam devendra fadnavis from breaking shiv sena ncp in dasara rally zws