नागपूर : एकाच घरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकराने १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्याने आईला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने मैत्रिणीच्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला तिच्या पतीने वर्षभरात सोडून दिले. तेव्हापासून ती मुलीसह वेगळी राहत होती. गेल्या दोन वर्षांपूर्वी आरोपी अमोल घरडे या युवकाशी ओळख झाली. एकट्या राहणाऱ्या महिलेवर अमोलची वाईट नजर गेली. दारूड्या असलेल्या अमोलने महिलेशी ओळखी वाढवली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. महिलेनेही संसाराला आधार म्हणून त्याच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्याचे महिलेच्या घरी येणे-जाणे वाढले. दोघांचे अनैतिक संबंधाची कुणकुण वस्तीतील लोकांना लगाली. त्यामुळे त्यांनी वस्ती सोडून हुडकेश्वरमध्ये खोली भाड्याने घेतली. तेथे ती महिला मुलगी आणि प्रियकर अमोलसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागली. मात्र, १० जानेवारी २०२२ मध्ये १३ वर्षांच्या मुलीवर अमोलची वाईट नजर पडली. तिची आई झोपल्यानंतर तो तिच्याशी अश्लील चाळे करायला लागला.

हेही वाचा >>>> अंधश्रद्धा निर्मूलनात शासनाचाच खोडा!; प्रचार-प्रसार समितीचे काम ठप्प, २२ कोटींचा निधी पडून

प्रेयसी घरी नसल्यावर तो तिच्याशी बळजबरी करायला लागला. तिने प्रतिकार केल्यास तिला आईला सोडून देण्याची धमकी देऊन ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे सुरुवातीला मुलगी गप्प बसली. त्यामुळे आईच्या प्रियकराची हिंमत वाढली. त्याने फेब्रुवारीमध्ये प्रेयसी गावी गेल्याचे बघून रात्रीला थेट तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर बलात्कार केला. गेल्या वर्षभरापासून अमोल हा त्या मुलीशी गेल्या वर्षभरापासून लैंगिक शोषण करीत होता. शारीरिक संबंधास नकार दिल्यास तिला मारहाण करीत होता. शेवटी तिने हा प्रकार मैत्रिणीच्या आईला सांगितला. तिने मुलीच्या आईशी चर्चा केली. त्यानंतर आईने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A mother boyfriend lives in a live in relationship daughter raped by mother boyfriend crime adk 83 ysh