नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शुक्रवारी नागपुरात आगमन झाले. यावेळी विमानतळावर घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते विदर्भातील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देणार आहे.