नागपूर: नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. शिपाई पदाच्या परीक्षेची उद्घोषणा नगर रचना विभागाने यापूर्वीच त्यांच्या संकेतस्थळावर केली होती. अर्ज सादर करतेवेळी सहायक पुरविण्याची मागणी केलेल्या दिव्यांग उमेदवारांना विभागातर्फे परीक्षा केंद्रावर सहायक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. ही परीक्षा झाली असून कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.

नगर रचना मुल्यनिर्धारण विभागाअंतर्गत पुणे, कोकण, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि अमरावती विभागात शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर भरती करण्यासाठी टाटा कंन्स्लटंन्सी सर्व्हिस या कंपनीने ऑनलाईन परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी घेतली. या परिक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांनी २६ फेब्रुवारीनंतर कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

हेही वाचा – कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

गुणवत्ता यादी, पात्र उमेदवारांची यादी व याबाबतीत सर्व सूचना विभागीय कार्यालयाच्या व नगर रचना विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याचे नगर रचना विभागाचे प्र. सहसंचालक यांनी कळविले आहे. यामुळे उमेदवारांनी वेळेत कागदपत्रांची पडताळणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.