लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर चॅनल २८० वर अचानक आग लागली. यात बसचे नुकसान झाले असले तरी चालकासह तेहतीस जणांचे प्राण बचावले.

एमएच ३७ टी ५४५४ क्रमाकाची ही बस अमरावती येथून पुणे कडे जात होती. शनिवारी रात्री निघाल्यावर समृद्धी महामार्गावर चॅनल २८० जवळ बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्या बाजुला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. फर्दापूर चौकीचे पीएसआय उज्जैनकर, हे. कॉ. कोळी, पो.कॉ. नाझीर यांनी घटनास्थळावर धाव घेतली. क्यूआरव्ही पथकाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली.

आणखी वाचा-ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून वाघ नखांना महत्त्व – सुप्रिया सुळे

चालक शेख रज्जाक शेख आयुब रा. दारव्हा यवतमाळ आणि प्रविण मुंडे रा. मंगरुळपीर वाशीम यांच्यासह ३२ प्रवाशी सुखरुप आहेत. भयभीत प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burning bus on samruddhi highway sudden fire in the running travels scm 61 mrj