चंद्रपूर : राजुरा मतदारसंघातील मतमोजणी सुरू असताना चार ईव्हीएम मशीनचे सील तुटलेले, तर एक मशीन बदललेली दिसून आल्याने काँग्रेने आक्षेप घेतला असता मतमोजणी थांबविण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – वर्धा जिल्हा १०० टक्के भाजपमय? चारही मतदारसंघांत विजयाकडे वाटचालीची चिन्हे

हेही वाचा – नागपूर : बुथ क्रमांक ३३ वर मशीनमध्ये सील नाही – काँग्रेसचा आक्षेप

राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप व भाजपचे देवराव भोंगळे यांच्यात काट्याची लढत आहे. येथे काँग्रेसचे सुभाष धोटे अवघ्या १५०० मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणी सुरू असताना चार ईव्हीएम मशीनचे सील तुटलेले दिसून आले. तसेच एक मशीन बदललेली दिसली असा आक्षेप काँग्रेसने घेतला. त्यामुळे येथील मतमोजणी थांबविण्यात आली आहे. मशीनचे सील कसे काय तुटले याबाबत काँग्रेसने अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur counting of votes stopped in rajura what is the reason rsj 74 ssb