वर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात भाजपचे चारही उमेदवार मतात मोठी आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. हिंगणघाट येथे समीर कुणावार यांनी शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांच्यावर पहिल्या फेरीपासून मात देणे सुरू केले. आता ते दहा हजर मतांनी आघाडीवर आहे. आर्वीत भाजपचे सुमित वानखेडे हे विक्रमी विजय नोंदविण्याची चिन्हे आहेत. ते सध्या १५ हजार मतांनी काँग्रेसच्या मयुरा काळे यांच्यापेक्षा आघाडी घेऊन आहेत.

सर्वात धाकधूक वर्ध्यात भाजपला वाटत होती. कारण पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे शेखर शेंडे हेच आघाडी ठेवून होते. ही मतमोजणी सेलू ग्रामीण भागातील होती. मात्र वर्धा शहरलगतचा ग्रामीण भाग सुरू होताच भोयर हे वेगाने पुढे निघाले. पडलेला खड्डा भरून काढत ते पुढे निघाले. प्राप्त माहितीनुसार, त्यांना १७ हजार मतांचे मताधिक्य आहे.

हेही वाचा – नागपूर : बुथ क्रमांक ३३ वर मशीनमध्ये सील नाही – काँग्रेसचा आक्षेप

हेही वाचा – यवतमाळ : महायुतीच मोठा भाऊ, महाविकास आघाडी दोन ठिकाणी खाते उघडणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवळीत भाजपचे राजेश बकाने हे पहिल्या फेरीपासून त्यांनी काँग्रेसचे रणजित कांबळे विरोधात आघाडी घेणे सुरू केले. देवळीत चुरशीची लढाई सुरू असून बकाने यांनी सध्या अडीच हजार मतांची आघाडी घेतली आहे. याच मतदारसंघावर भाजपने सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे प्राथमिक फेऱ्यात बकाने यांनी आघाडी घेतल्याने भाजप गोट विजयाबाबत आश्वस्त असल्याचे दिसून येते.