चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक व शिपाई पदाच्या ३५८ जागांच्या भरती प्रक्रियेत किमान शंभर कोटींची उलाढाल झाली असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा ओबीसी सेलचे मनोज पोतराजे यांनी केली आहे. अतिशय पध्दतशिरपणे हा नोकर भरतीत भ्रष्टाचार झाला असून तक्रादाराने मुद्देसूद म्हणणे मांडले आहे. विशेष म्हणजे, सोमवारी बँकेच्या सभागृहात शिपाई पदाच्या मुलाखती बँकेेचे अध्यक्ष संतोष रावत, सीईओ राजेश्वर कल्याणकर, उपाध्यक्ष व उपमुख्य कार्यकारी अधिकारी या चौघांनी घेतल्या. तगडा सशस्त्र पोलीस बंदोबस्त, खासगी बॉऊंसर लावण्यात आले होते. मुलाखत स्थळी जाण्या-येण्यास सर्वांना मज्जाव केला होता. महत्त्वाचे म्हणजे, रविवारी (१२ जानेवारी) भद्रावती येथील बँकेच्या एका माजी संचालकाच्या निवासस्थानी बँकेच्या अध्यक्षांसह सर्व संचालक व सीईओंची बैठक झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्तीं सहकारी बॅंकेतील लिपीक २६१ आणि शिपाई ९७ पदांसाठी ऑनलाईन परिक्षा २१ ,२२,२३ आणि २९ डिसेंबर झाली. नोकर भरतीत संचालक मंडळांनी संविधानाच्या मुलभूत तत्वाला पायदळी तुडविले. आता शिपाई पदांच्या मुलाखती १३, १४ आणि १५ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर लिपीक पदांच्या १६ ते २३ जानेवारी रोजी आहे. ही संपूर्ण नोकर भरतीच संशयास्पद आहे. जवळपास शंभर कोटी रुपयांची उलाढाल या भरतीत आहे.

हेही वाचा : अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “

१२ वर्षांपासून या बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली नाही. याकाळात नोकर भरती आणि अन्य गैरव्यवहारात दोन माजी अध्यक्षांवर गुन्हा दाखले झाले. त्यांना तुरुंगात जावे लागले. या बॅंकेतील एक माजी संचालक राज्यातील नोकर भरतीच्या रॅकेटसोबत सक्रीय आहे. अनेक शासकीय भरतीत त्याने गैरव्यवहार केले आहे. त्याच संचालकावर ऑनलाईन भरतीतील सेटींगची जबाबदारी दिली. या बॅंकेतील नोकर भरतीचा यापूर्वीचा वादग्रस्त इतिहास बघता आपण कोणत्याही कायदेशीर प्रक्रीयेत अकडून नये, यासाठी त्याने संचालक पदाचा राजीनामा देत ही जबाबदारी स्वीकारली. नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आयटीआय कंपनीतील एक वरिष्ठ अधिकारी पद्ममेश याला हाताशी पकडले. आॅनलाईन परिक्षेत उत्तीर्ण करुण देण्यासाठी प्रति उमेदवारामागे तीन लाख रुपये याप्रमाणे दहा कोटींची डिल आटीआय कंपनीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांशी झाली असे तक्रारीत नमूद आहे.

परिक्षेच्या पहिल्याच दिवशी २१ जानेवारीला राज्यातील काही मोजक्या केंद्रावर तांत्रिक बिघाड झाला आणि परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र हा तांत्रिक बिघाड नव्हता. काही हॅकर्सनी स्क्रीन हॅक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या चोरीत आणखी वाटकेरी निर्माण झाल्याचे कंपनी आणि या गैरव्यवहारत सक्रीय बॅंकेतील काही संचालकांच्या लक्षात येताच त्वरीत परिक्षा पुढे ढकलण्यात आली. मुळात आयटीआय कंपनीने परिक्षेच्या दोन दिवस आधी मॅाक ड्रील घेतली होते. ते यशस्वीही ठरले. आॅनलाईन परिक्षेत एकूण परिक्षणार्थ्यांच्या दहा टक्के संगणक राखीव असतात. त्यानंतरही हा प्रकार तांत्रिक बिघाड म्हणून सांगण्यात आला. मात्र हा सायबर हल्ला होता. या सायबर हल्ल्यात बॅकेतील एक विरोधी संचालकही सामील आहे.

हेही वाचा : मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…

सुरूवातीला काही संचालकांनी रोख रक्कम स्वीकारली. मात्र भरतीला होणार विरोध आणि पैसे घेतल्याच्या तक्रारी पोलिसांकडे झाल्यानंतर ते सावध झाले. त्यानंतर त्यांनी सेटींगवाल्या उमेदवारांचे ओरीजन डाक्युमेंन्टस आपल्याकडे तारण म्हणून ठेवले. मुलाखतीला जाताना आणि डॅाक्युमेंट व्हेरीफेकशन साठी ओरीजनल कागदपत्र हवे असतात. ते सोडविण्यासाठी तीस ते ४० लाख रुपये उमेदवार देत आहे. बॅंकेतील काही संचालक आणि आयटीआय कंपनीचे अधिकारी यांचा भ्रमणध्वनाची सीडीआर काढल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.

केवळ दोन जिल्ह्यातील उमेदवार पात्र!

शिपाई पदांच्या मुलाखतीला बोलविण्यासाठी २९१ पात्र उमेदवारांची यादी बॅंकेने जाहीर केले. या यादीतील उमेदवारांचे पत्ते शोधल्यास बॅंकेच्या नोकर भरतीतील घोळ समोर येईल. जवळपास ९० टक्के नावे ही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. दोनच जिल्ह्यातील विद्यार्थी पात्र ठरले. त्यातही मुल, ब्रह्मपुरी, सावली, वरोरा, राजुरा, भद्रावती याभागातील उमेदवार मोठ्या संख्येत मुलाखतीसाठी बोलविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur district bank recruitment private bouncer and 100 crores transactions scam rsj 74 css