बुलढाणा : राज्यातील १२ जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळाले असून यात विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश आहे. बुलढाण्यात शिंदे गटाचा तीव्र विरोध असताना राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पालकत्वाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अकोला : शिक्षणाचे बाजारीकरण! संपूर्ण व्यवस्थाच कंपन्यांच्या हातात देण्याचा घाट, ‘विज्युक्टा’ राज्यभर आंदोलन उभारणार

हेही वाचा – बुलढाणा : खामगावातील दोन दुकानांना आग; लाखोंची हानी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजी नाट्यानंतर वेगाने राजकीय चक्रे फिरली. त्यामुळे १२ नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, संजय रायमूलकर यांचा सक्त विरोध असतानाही बुलढाण्याची जबाबदारी अजित पवार गटाचे वळसे पाटील यांच्यावर देण्यात आली. अमरावती चंद्रकांत पाटील, अकोला राधाकृष्ण विखे पाटील, भंडारा विजयकुमार गावित, वर्धा सुधीर मुनगंटीवार, गोंदिया धर्मरावबाबा आत्राम हे नवीन ‘पालक’ असतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip valse patil is the new guardian minister of buldhana scm 61 ssb