नागपूर : पुण्याहून नागपूरला येणारे विमान अंधूक प्रकाशामुळे नागपूरऐवजी मुंबईकडे वळवण्यात आले. मंगळवारी नागपूरकडे उड्डाण केलेले इंडिगोचे विमान छत्रपती संभाजीनगरच्या हवाई क्षेत्रात असताना अंधूक प्रकाशामुळे मुंबईकडे वळविण्यात आले. हे विमान पुणे येथून सकाळी ११.१५ वाजता उडाले आणि १२.३० वाजता नागपूरला पोहोचणे अपेक्षित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – गोंदिया : सरांडी येथे विहिरीत विजेचा शॉक लागून चारजणांचा मृत्यू, मृतदेह अद्याप विहिरीतच

दरम्यान, मुंबई येथून इंडिगोने प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची सोय करून दिल्याने ते विमान सायंकाळी साडेपाच वाजता नागपूर विमानतळावर उतरले. पावसामुळे धुक्याची गडद चादर पसरली होती. याचा परिणाम विमानसेवेवर झाला. पुणे विमानतळावरुन नागपूरसाठी उडालेले विमान अंधूक प्रकाशामुळे विमान उड्डाणाचा मार्ग वळविण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी म्हटले होते. तब्बल साडेपाच तास उशिराने इंडिगोचे ते विमान नागपुरात साडेपाच वाजता उतरले आणि सांयकाळी ६.३० वाजता मुंबईला रवाना झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to dim light plane diverted to mumbai instead of nagpur rbt 74 ssb