राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज ऑलनाईन बैठक झाली. त्यावर जरांगे पाटील ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आहे. त्यासाठी ते मुंबईत आंदोलन करणार आहे. त्यामुळे सरकारव दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. महासंघाची भूमिका मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, अशी आहे. परंतु जरांगे पाटील यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. त्यांच्या या भूमिकेच्या विरोधात महासंघ आंदोलन करणार आहे. या बैठकीला अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, सरचिटणीस सचिन राजुरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आझाद मैदान परिसरातील रहिवाशांना, रहदारीला कमीत-कमी अडथळा येईल, तसेच आंदोलकांसाठी पुरेशी जागा देखील उपलब्ध होईल या गोष्टींचा विचार या अटी-शर्तींमध्ये करण्यात आल्याचे म्हटले आहे.

जरांगे यांचा फडणवीसांना इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, मी समाजासाठी गोळ्या झेलायला तयार आहे. सरकार मराठाविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया करत आहे. मी आझाद मैदानात उपोषण आंदोलन करणार आहे. आज माझ्यासोबत आलेले सर्व आंदोलक हे मला आझाद मैदानात सोडून परत आपापल्या गावी जाणार आहेत. त्यांना सगळ्यांना आझाद मैदानापर्यंत येऊ द्यावे, ही सरकारकडे विनंती आहे. दुसरी विनंती आहे की, आरक्षण देऊन मराठ्यांचे मन जिंकण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आली आहे. मराठी समाज हा इमानदार आहे, देणाऱ्याचे उपकार कधी विसरत नाही, मात्र अपमान करणाऱ्यांना कधी सोडत नाही, हे देखील फडणवीसांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. गरीब मराठ्यांच्या हक्काचे ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, असेही ते म्हणाले.

एका दिवसात आरक्षण द्या’

जरांगे यांच्या आंदोलनाला २६ ऑगस्टला परवानगी मिळाली. पोलिसांनी दिलेल्या परवानगीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही नियमांचं पालन करून आंदोलन करणार. परवानगी दिली असेल तर स्वागत मात्र एक दिवसांचं परवानगी मान्य नसल्याचं मनोज जरांगे यावेली म्हणाले. तसेच एका दिवसात आरक्षण द्या आंदोलन मागे घेतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले.

समाजाला मनोज जरांगे यांचे आवाहन,

मनोज जरांगे यांचे प्रथमच मुंबईत आंदोलन होत आहे. याआधी त्यांचा मोर्चा वाशीमध्ये अडवण्यात आला होता. वाशीमध्येच त्यांना थांबवण्यात आले आणि तिथेच आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मात्र मुंबईतील आझाद मैदान येथे ऐन गणपती उत्सवकाळात आंदोलन होणार आहे. त्यामुळे आंदोलनात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आंदोलकांवर देखील आहे.