हिवाळी अधिवेशनाचा आज ( २० डिसेंबर ) दुसरा दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात पायऱ्यांवर आंदोलन केली होती. तर, विधानसभेतही शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) आदित्य ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नावरून मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अनुसरून आदित्य ठाकरेंनी एक प्रश्न उपस्थित केला. “शहरात चुकीच्या बाजूने वाहने चालवण्याचे प्रमाण वाढलं आहे. सिग्नल तोडणे जात असून, यावर कारवाई होणं गरजेचं आहे, अन्यथा अपघात होत राहणार. तसेच, राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही शिस्त न पाळता वाहने चालवले जातात. यांच्यावर नुसती दंडात्मक कारवाई न करता तात्काळ जागेवर कारवाई करावी,” अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.

हेही वाचा : महाराष्ट्रात ‘कोयता गँग’ची दहशत! अजित पवारांनी थेट विधानसभेत उपस्थित केला मुद्दा; म्हणाले, “हवं तर त्यांना..!”

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळ एस पूल आहे. तिथे लाईटची सुविधा नाही, अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, एक सूचना अशी आहे, सरकारला पटते का बगा? मागच्या दोन-तीन महिन्यांमध्ये एक रस्ता असा आहे. जिथे ४० लोक रात्री आणि दिवसा पण पळून जायचे. तो रस्ता आहे, मुंबई-सुरतचा. त्या रस्त्याची एकदा गुणवत्ता पाहावी. मग, पळता येत, धावता येत आणि तिथून गुवाहाटीला सुद्धा जाता येत,” असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

याला शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, “विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मांडलेले मुद्दे आदित्य ठाकरेंनी परत उपस्थित केले. विरोधी पक्षनेत्यांना उत्तर दिलं, तेच त्यांनाही माझं उत्तर आहे. पण, सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. शिल्लक सेनेत राहिलेल्यांना त्या रस्त्याचा वापर करायला लागू नये. एवढी काळजी त्यांनी घ्यावी,” असं शंभूराज देसाईंनी सांगितलं.

हेही वाचा : यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही…; सभागृहात जयंत पाटील संतापले

तर आदित्य ठाकरेंच्या टोल्याला गुलाबराव पाटील यांनीही पलटवार केला आहे. “विरोधी पक्षानेत्यांनी विचारलेला प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. सुरत आणि गुवाहाटीवरून चर्चा करायची असेल, तर यांना दाखवतो मात्रोश्रीचे रस्ते कसे होते, कसे झाले. तुम्ही सुरत कसे गेले, गुवाहाटी कसे गेले, हे बोलण्याची गरज नाही. गेले, आता तुमचा विषय संपला,” अशा संतप्त शब्दात गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil and shabhuraje desai reply aaditya thackeray assembly winter session ssa