भंडारा : मोक्का प्रकरणातील सराईत आरोपी नईम शेखची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ काल २५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या खुनाचा मुख्य आरोपी संतोष दहाट हा फरार असून दोन वर्षांपूर्वी नईमने त्याच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नईम शेख खानचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
तडीपार असलेला कुख्यात गुंड संतोष दहाटने आपल्या नागपूर
हेही वाचा : कार पार्कींगचा वाद; पोलीस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
दरम्यान गाडी थांबवून नईम शेखवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्याच्या वेळी नईमचे तिन्ही साथीदार पळून गेले. नईम मृत झाल्याचे समजताच संतोष दहाट व त्याचे साथीदार घटना स्थळावरून पळून गेले. पुढे मृतक नईमच्या साथीदारांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी चार आरोपींना भंडारा
हेही वाचा : राज्यात हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ
दोन वर्षांपूर्वी मृतक नईम शेखने तडीपार गुंड संतोष दहाटवर गोळीबार केला होता. त्यात संतोष दहाट वाचला. तेव्हापासून तो नईम शेखच्या मागावर होता. आज संधी मिळताच त्याने नईम शेखचा ‘गेम’ केला. भंडारा पोलिस मुख्य आरोपी संतोष दहाटचा शोध घेत आहेत. बॅटरी व्यावसायिक आणि नंतर वाळू तस्करीचा म्होरक्या झालेला मोक्काच्या आरोपीचा झालेला असा झालेला अंत चर्चेचा विषय ठरला आहे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhandara mcoca criminal naim shaikh khan murdered as revenge taken by his enemy for deadly attack years ago ksn 82 css