Premium

दांडियाच्या सरावात रमली तरुणाई, विविध नृत्य प्रशिक्षकांकडून घेत आहेत रास गरबाचे धडे

गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी रास गरबा, दांडियाचे क्लासेस सुरू झाले आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे.

gondia young girl and boys, practice of dandiya, practice of dandiya ras garba
दांडियाच्या सरावात रमली तरुणाई, विविध नृत्य प्रशिक्षकांकडून घेत आहेत रास गरबाचे धडे (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

गोंदिया : गणेशोत्सव संपताच नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी रास गरबा, दांडियाचे क्लासेस सुरू झाले आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. यावर्षी दांडिया व गरब्याचे अनेक नवीन प्रकार विकसित झाले असून तरुणाईला नृत्य प्रशिक्षक त्यातील लेटेस्ट स्टेप्स शिकवत आहेत. विशेषतः शहराच्या अनेक भागात तरुणाई गरब्याच्या शिबिरांमध्ये ठेका धरताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी गरबा – दांडियाची परंपरा जिवंत ठेवली आहे, अशा खासगी क्लासेसकडून गरबा, दांडियाच्या क्लासेसला सुरुवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डान्स अकॅडमीच्या माध्यमातून सध्या सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन-दोन बॅचेस सुरू आहेत. गोंदिया शहरात किमान १५ ते २० ठिकाणी (हॉल, मंगल कार्यालये, मैदाने) गरबा व दांडिया शिकविला जात आहे. ग्रामीण भागाचा विचार केल्यास तालुका मुख्यालयातही यंदा दांडिया गरबाची क्रेज वाढली असून मंदिर परिसरातच महिला, युवतींसह लहान मुलींना दांडिया गरबाचे धडे दिले जात आहेत.

हेही वाचा : नांदेड रुग्णालय मृत्युसत्रानंतर प्रशासन सतर्क, यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह स्त्री रुग्णालयात…

असे आहे गरब्याचे प्रकार

घूमर : हा सर्वाधिक खेळला जाणारा प्रकार आहे. विशेषतः राजस्थानमध्ये हा लोकप्रिय आहे.
दांडिया रास : अत्यंत वेग आणि चपळाईने खेळला जाणारा हा नृत्यप्रकार आहे. गरबा खेळताना तरुणी, तसेच महिला परिधान करतात त्या घागरा चोली देशभर प्रसिद्ध आहे.
डिस्को गरबा : बदलत्या काळानुसार उगम पावलेला नृत्य प्रकार म्हणजे डिस्को गरबा आहे. आधुनिक गीतांवर तरुण-तरुणी थिरकत असतात.

हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल,” सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास; म्हणाले…

पोशाखाची मागणी

गरबा दांडियामध्ये हिंच, दोडियो, पोपटियो, दोन ताली, चार ताली, छगडी, रास गरबा, टिटाडा आदी अनेक प्रकार खेळले जात आणि ओढणी परिधान करतात. त्यामुळे या पोशाखांची मागणी होत आहे. “मागील सात वर्षांपासून नवरात्री उत्सवादरम्यान, रास गरबाचे आयोजन करण्यात येते, त्यासाठी महिला, युवती व विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण दिले जात असतानाच त्यांचा पोशाख, चाहा-नाश्ता आदी सेवा पुरविली जात आहे. दांडियाचा प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर, गोंदिया, जबलपूर येथील नृत्य प्रशिक्षक बोलावण्यात येत असून दरवर्षीप्रमाणेच यंदाही गरबासाठी विद्यार्थिनींची उत्सुकता दिसून येत आहे”, असे गोंदिया येथील रास गरबा उत्सव समितीचे अध्यक्ष राम पुरोहित यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In gondia young girl and boys started practice of dandiya and ras garba sar 75 css

First published on: 08-10-2023 at 14:33 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा