Premium

संसद भवनात पत्रकार गॅलरीशिवाय इतर ठिकाणी आता पत्रकारांना….

केंद्रात भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य देण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे.

former congress mla anant gadgil, congress leader anant gadgil criticize bjp, congress leader anant gadgil on journalists
संसद भवनात पत्रकार गॅलरीशिवाय इतर ठिकाणी आता पत्रकारांना… (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : केंद्रात भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य देण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे. भाजपला सातत्याने विरोध करतात म्हणून गेल्या ३-४ वर्षात दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील टीव्ही चॅनेलच्या प्रसिध्द संपादकांचे राजीनामे घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसद भवनात पत्रकार गॅलरीशिवाय इतर ठिकाणी आता पत्रकारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. संसदेत पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना निवृती नंतर पूर्वी विशेष पास दिला जायचा. तोही बंद करण्यात आला आहे. निर्भिडपणा दाखविणाऱ्या चॅनेलची मालकीच बदलण्यात आली.

हेही वाचा : हद्दच झाली! परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपरचे दहा प्रश्न रद्द

आता तर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून पत्रकारांची प्रतिमा पार धाब्यावर बसवली आहे. हेच काँग्रेसच्या राजवटीत झाले असते तर अग्रलेखांनी पेपर भरून गेले असते. एवढे सारे होऊनही पत्रकार गप्प का? किती पत्रकारांनी याविरूद्ध आवाज उठविला, सवालही गाडगीळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nagpur former congress mla anant gadgil criticize bjp for treatment given to the journalists at parliament rbt 74 css

First published on: 27-09-2023 at 17:08 IST
Next Story
गोंदिया: जीव मुठीत घेत पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास!