नागपूर : राज्यातील १०० गावांमध्ये शंभर टक्के सौरऊर्जेचा वापर करण्याची योजना महावितरणने आणली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये जालना जिल्हा (पातोडा, दारेगाव), बीड जिल्हा (नानदी, आनंदवाडी), लातूर जिल्हा (नवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी), हिंगोली जिल्हा (सुलदळी गोरे, दातेगाव ), नांदेड जिल्हा (हाडोळी, दवणगीर), परभणी जिल्हा (आंबेटाकळी, मुरूमखेडा), पेण मंडळ (पाडवी पठार, वडवळ ), वाशी मंडळ ( नेरेपाडा गाव, सिवानसाई गाव), धुळे जिल्हयातील (कलगाव, नाथे)चा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव जिल्हा ( निंबोल, पातोंडी), नंदुरबार जिल्हा (मोहिदा, ब्राहमणपुरी), कल्याण मंडळ- १ ( शिरवली कुंभारली), कल्याण मंडळ- २ (गोलभान, मोहोप ), पालघर जिल्हा ( अक्करपट्टी, कोलगाव), वसई मंडळ (शिवनेरी, निर्वाण ), रत्नागिरी जिल्हा (फुरुस, असूर्डे), अहमदनगर जिल्हा ( पारेगाव, हिवरे बाजार), मालेगाव मंडळ (वाके, निंबोळा ), नाशिक मंडळ (कोनांबे, दारणा सांगवी), अकोला जिल्हा ( सौंदाळा, सांगलुड), बुलढाणा जिल्हा (बजरंग नगर- सागवान एरिया, सावजी लेआऊट, सुताळा खुर्द), वाशीम जिल्हा ( झकलवाडी, पारवा ), अमरावती जिल्हा (नवाथे, काठोरा ), चंद्रपूर जिल्हा ( सोमनाथ, आनंदवन), गडचिरोली जिल्हा (कोंढाणा तुंबडी मेंढा ), भंडारा जिल्हा (भोसा, दहेगाव ), नागपूर ग्रामीण मंडळ (चिखली,सिंधी ), नागपूर शहर मंडळ ( किरमिती भारकस, कॉस्मोपॉलिटन), वर्धा जिल्हा (नागझरी, नेरी मिर्जापूर ), बारामती मंडळ (वांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव), सातारा जिल्हा ( मान्याची वाडी), सोलापूर जिल्हा ( चिंचणी, औज), कोल्हापूर जिल्हा (शेळकेवाडी, पिराचीवाडी ), सांगली जिल्हा (झुरेवाडी निमसोड ), गणेशखिंड मंडळ ( शिवतीर्थ नगर, सेक्टर २५ निगडी) या जिल्ह्यांचा समावेश करण्याता आला आहे. या गावात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत घरगुती वीज ग्राहकांना ३ किलोवॅटपर्यंत ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध दिले जाणार आहेत.

हेही वाचा…नागपूर : सोन्याच्या दरात मोठे बदल; ग्राहकांमध्ये चिंता वाढली…

सोबतच सर्व वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी करण्यासाठी आवाहन केले जाणार आहे, अशी माहिती महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांनी दिली. दरम्यान केंद्राने योजना जाहिर केल्यानंतर एखाद्या राज्याकडून या योजनेच्या आधारे तब्बल शंभर गावे शंभर टक्के सौर प्रकाशावर चालवण्यासाठी योजना आखलेले महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य राहणार आहे, हे विशेष.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran going to use hundred percent solar energy power in 100 villages of maharashtra under new pradhan mantri surya ghar scheme mnb 82 psg