नागपूर: मुंबई पोलिस भरतीत शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ११ व १२ जानेवारी रोजी घेण्यात आली. पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर या तीन पदांसाठी परीक्षा झाली. त्यातील कारागृह शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर या पदांची परीक्षा ११ जानेवारी रोजी आहे तर पोलीस शिपाई या पदासाठीची परीक्षा १२ जानेवारी रोजी झाली. या परीक्षेत राज्यभरातील विद्यार्थी अर्ज करतात. विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा दिली. परंतु, शनिवारी कॉपी करताना एकाला पकडल्यानंतर रविवारी वेगवेगळ्या केंद्रांवर पाच जणांना अटक करण्यात आली. ‘इलेक्ट्रिक डिव्हाइस’ आणि ‘इअर बर्ड’सोबत कॉपी केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यासोबत बनावट हॉल तिकिटांचा वापरही समोर आला. यामध्ये चालकपदासाठी आलेल्या एकाचा, तर शिपाईपदासाठी आलेल्या चार उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सुरुवातीलाच या परीक्षेत गैरप्रकार होण्याची शंका उपस्थित केली होती. तसेच परीक्षा घेताना कुठल्या उपाययोजना कराव्या अशा सूचनाही दिल्या होत्या. मुंबई पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू असून मैदानी चाचणीनंतर आता विविध केंद्रांवर लेखी परीक्षा घेतल्या जात आहेत. बोरिवली पूर्वेकडील एका शाळेतील केंद्रात एका उमेदवाराकडे ‘ब्ल्यू टूथ डिव्हाइस’ सापडले. याप्रकरणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरा प्रकार चेंबूर परिसरात समोर आला. खासगी कॉलेजमधील केंद्रात लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या दोन उमेदवारांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ‘व्हिझिटिंग कार्ड’सारखे उपकरण आढळले. पोलिसांनी ते उघडले असता, ते सिमकार्ड, बॅटरी आणि ‘इअर बर्ड’ने जोडले होते. दोन्ही विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीत चांगले गुण मिळाले होते. या प्रकारामुळे अन्य उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिले हे उपाय

१) प्रत्येक परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बंधनकारक करण्यात यावे- इलेक्ट्रॉनिक उपकरणे (मायक्रो ब्लूटूथ, कार्ड, आणि मायक्रो कॅमेरा) वापरून पेपर फोडण्यात येतो म्हणून सर्व परीक्षा केंद्रांवर सक्तीने मोबाईल जॅमर कार्यान्वित करण्यात यावे. कारण पेपर फोडणाऱ्या टोळ्या मोबाईल सिमव्दारे संपर्कात असतात.

२) सर्व हॉलमध्ये सीसीटीव्ही लाऊन परीक्षा घेण्यात यावी : परीक्षा संपल्यानंतर एखाद्या उमेदवारांवर पेपर फोडल्याचा संशय असल्यास सीसीटीव्ही उपयोगात येते. मागील लेखी परीक्षेत सीसीटीव्ही नसल्याने अनेक दोषींवर कार्यवाही करता आली नाही.

३) जालना, संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील उमेदवारांच्या परीक्षा एका विशिष्ट केंद्रात घेण्यात याव्यात : मागील पोलिस भरतीत आरोपी असलेले उमेदवार मुख्यत्वे वरील तीन जिल्ह्यातील रहिवासी होते. याच जिल्ह्यांमध्ये पेपर फोडणाऱ्या मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे परीक्षेत गैरप्रकार टाळायचा असल्यास सदर तीन जिल्ह्याच्या उमेदवारांच्या परीक्षा विशिष्ट परिसरात घेऊन त्या सर्व उमेदवारांची आणखी चोख तपासणी करून परीक्षा घेण्यात यावी.

हेही वाचा : पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत

४) मेटल डिटेक्टर आणि इतर उपकरणांव्दारे उमेदवारांची तपासणी करण्यात यावी – पेपर फोडणाऱ्यांकडे अतीसुष्म ब्लूटूथ कानात घालण्यात येत तर बटनाच्या आकाराच्या कॅमेराद्वारे पेपर फोडला जातो म्हणून उमेदवारांची मेटल डिटेक्टरव्दारे तपासणी करण्यात यावी. चप्पल, बुट, दागिने, पाकीट, बेल्ट किंवा कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रात नेण्याची बंदी असावी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police recruitment written exam irregularities dag 87 css