समृद्धीप्रमाणे 'नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग ' होणार : देवेंद्र फडणवीस | Nagpur Goa Expressway will be done like Samriddhi Expressway Devendra Fadnavis amy 95 | Loksatta

समृद्धीप्रमाणे ‘नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग ‘ होणार : देवेंद्र फडणवीस

नरेडको’च्या कार्यक्रमात माहिती

समृद्धीप्रमाणे ‘नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग ‘ होणार : देवेंद्र फडणवीस
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ -मराठवाडा -पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ ( नरेडको ) या संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.नागपूर हे शहर ‘लॉजिस्टिक हब ‘ म्हणून पुढे येणार आहे. नागपूर वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात ‘लॉजिस्टिक सपोर्ट ‘ तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहराला आठ ते दहा तासात नागपूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या शहरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे.

हेही वाचा >>> नागपूर : दक्षिण पश्चिमच्या कार्यकर्त्यांकडून सहकार्य नाही! ; फडणवीसांसमोरच गडकरींची जाहीर नाराजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किलोमीटरचे ‘एक्सप्रेस ‘महामार्ग तयार करण्याचे सुतोवाच केले आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर ‘, म्हणून विकसित होणार आहे.यापाठोपाठ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा हा नवा ‘इकॉनोमिकल कॉरिडॉर ‘तयार होत आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर दिल्ली आणि नागपूर हैदराबाद महामार्ग विकसित होणार आहे. त्यामुळे विदर्भात लवकरच नवे नागपूर,नवे वर्धा, नवे अमरावती अशी विस्तारित शहरे आकारास येणार आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नागपूर: क्रिकेट सामना मेट्रोला पावला ; एका दिवसाची प्रवाशी संख्या ८१ हजार ,सामना संपल्यावर रात्री ३ पर्यंत सेवा

संबंधित बातम्या

यवतमाळ : रस्ता देता का रस्ता?, चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याचे शेतात उपोषण
सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन ब्राह्मणांनी पापक्षालन करायलाच हवे!
एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षकाचा महिलेवर अ‍ॅसिड हल्ला
“एखाद्या लग्नात गेलं तरी खोकेवाला….”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत
राज्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर मिळणार कधी?; कोटय़वधींच्या इमारती केवळ शोभेच्या वास्तू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द