नागपूर:  शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक ते सहाय्यक प्राध्यापकांची ३७ पदे भरण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही पदे वाढताच नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील पदव्युत्तरच्या जागा ५१ वर पोहचतील. त्यामुळे नागपूर हे राज्यातील सर्वाधिक पदव्युत्तर जागा असलेले शासकीय दंत महाविद्यालय ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात नागपूर, मुंबई, औरंगाबाद अशी तीन शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये आहेत. मुंबईच्या दंत महाविद्यालयात पदव्युत्तरच्या सुमारे ५० जागा, नागपूर आणि औरंगाबादला प्रत्येकी २४ च्या जवळपास जागा मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे मंजूर जागांपेक्षा कमी विद्यार्थीच पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.

हेही वाचा : ‘स्पा’च्या नावावर सेक्स रॅकेट; नागपूरच्या जिंजर मॉलमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूरच्या तरुणींकडून देहव्यापार

नागपुरातील रुग्णालयाने वैद्याकीय शिक्षण विभागाला ३७ पदे भरण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रवेश क्षमता ५१ वर पोहचेल. ही पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचे नियोजन आहे. त्याबाबत वैद्याकीय शिक्षण खात्याला प्रस्तावही गेला आहे. त्याला शासनाने अनुकूलताही दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच ही पदे कंत्राटी स्वरूपात भरून येथे पदव्युत्तर जागा वाढतील. त्यानंतर ही पदे कायम स्वरूपातही भरली जातील, असे नागपूर दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी सांगितले.

हेही वाचा : प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापकांची ३७ पदे भरताच पदव्युत्तरच्या जागांची संख्या ५१ वर पोहोचेल. ही राज्यातील शासकीय दंत महाविद्यालयातील सर्वोच्च संख्या असेल. त्यामुळे गरीब- मध्यमवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना माफक दरात दर्जेदार पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय

नऊ विषयांसाठी प्राध्यापकांची पदेभरणार

नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात लवकरच सुपरस्पेशालिटी दंत रुग्णालय सुरू होणार आहे. त्यासाठी येथे प्राध्यापक ते सहाय्यक प्राध्यापक- वरिष्ठ निवासी डॉक्टर अशा वेगवेगळ्या ९ विषयात ३७ प्राध्यापकांची पदे भरली जातील. त्यात कृत्रिम दंतशास्त्रचे ६, दंत शल्यशास्त्रचे ६, बाल दंतशास्त्रचे ४, मुखरोग निदान व क्ष- किरणशास्त्रचे ४, मुख शल्य चिकित्साशास्त्रचे ४, दंत व्यंगोपचारचे ४, दंत विकृतीशास्त्रचे ४, बायोमेडीकल इंजिनिअर विभागाचा एक अशी एकूण ३७ पदे आहेत

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur government dental college 51 postgraduate seats highest in the state mnb 82 css