नागपूर : राहुल गांधींच्या तोंडी सामान्य माणसाच्या मनातील गोष्टी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी नागपूरमध्ये झालेल्या संविधान सन्मान संमेलनात दोनशेहून अधिक सामाजिक संघटना सहभागी झाल्या. त्यात संविधाानबाबत राहुल गांधी जे मत मांडतात तेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील विचार आहे, अशी भावना संमेलनात सहभागी झालेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत स्वातंत्र झाल्यावर संविधान निर्मिती करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देण्यात आली. त्यांनी देशाला संविधान दिले. मात्र त्यावेळीही जातीयवादी शक्ती त्याला विरोध करीत होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच शक्तीने ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर संविधान बदलवले जाईल, असे सांगितले होते. पण संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या अधिकाऱामुळे सर्वसामान्य जनतेने जातीयवादी शक्तीचे मनसुबे उधळून लावले. देशात आज संविधान संकटात असल्याने राहुल गांधी त्याच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहे., अशी भावना यावेळी वक्त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा… राहूल गांधींचे नागपुरात जल्लोषात स्वागत, दीक्षाभूमीला अभिवादन, निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा संविधान विषय

स्वातंत्र संग्राम सैनिक लीलाताई चितळे यांनी संविधानाच्या समर्थनार्थ युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले. सध्याची स्थिती पाहता एका डोळ्यात आश्रू तर दुसऱ्या डोळ्यात हसू आहे, असे सांगितले आहे. राहुल गांधी यांच्यासारखे नेते संविधान बचावसाठी रस्त्यावर उतरत आहे हे पाहून समाधान वाटते तर दुसरीकडे रोज होणारीसंविधानाची हत्या पाहून दुख होते , असे लीलाताई चितळे म्हणाल्या. प्रसिद्ध विचारवंत नागेश चौधरी म्हणाले, राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. ही मागणी या देशाचा एक्स रे आहे . यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला आरक्षणाची संधी मिळेल. त्यासाठी आरक्षणावरची सध्याची मर्यादा हटवावी लागेल, हेच राहुल गांधी सांगत आहे, असे नागेश चौधरी म्हणाले.

हे ही वाचा… निवडणुकीच्या धामधुमीत वीज यंत्रणा विस्कळीत होणार? महावितरणमधील वाहन पुरवठादार…

ज्यांनी राष्ट्रपीत्याची हत्या केली तेच आम्हाला राष्ट्रवाद शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे, तो आम्ही त्यांच्याकडून शिकणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन निर्भय बनो संघटनेचे प्रतिनिधी विश्वंभर चौधरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur samvidhan sammelan constitution vishwambhar chaudhary criticize bjp on nationalism issue cwb 76 asj