नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर श्वान आढळल्याने एक विमान सोमवारी रात्री उशिरा भोपाळ येथे वळवावे लागले. धावपट्टीवरील श्वानामुळे विमान उतरविताना कुठला अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात आला येण्याची शक्यता होती. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने कुठलीही अनुचित घटना घडली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ५२४३ हे विमान मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १०.५५ वाजता मुंबईहून नागपूरच्या दिशेने उडाले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवित असताना धावपट्टीवर श्वान वा श्वानसदृष्य प्राणी असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. विमान उतरविताना श्वानामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत वैमानिकाने रात्री १२.३० ते १ वाजतादरम्यान विमान भोपाळला वळविले. दरम्यान, नागपूर विमानतळावरील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. श्वान वा इतर कुठल्याही प्राण्यामुळे विमान उतरविताना अडथळा येणार नाही, याची निश्चिती करण्यात आली. त्यानंतर रात्री २.३० वाजता विमान नागपूर येथे परतले. या प्रकारामुळे निर्धारित वेळापत्रकानुसार रात्री १२.३५ वाजता नागपूर येथे पोहचण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या प्रवाशांना काहीसा विलंब सहन करावा लागला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plane diverted to bhopal after a dog was found on the runway of dr babasaheb ambedkar international airport rbt 74 amy