कुठे होणार समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा? |pm narendra modi will inaugurate the samriddhi highway near the village of vaiphal nagpur | Loksatta

कुठे होणार समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा?

शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा तालुक्यातील वायफळ या गावाजवळील कार्यक्रम स्थळाला भेट दिली.

कुठे होणार समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा?
कुठे होणार समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा?

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन येत्या ११ डिसेंबर रोजी होऊ घातले आहे. पंतप्रधानांच्या उपस्थित होणारा लोकार्पण समारंभ भव्यदिव्य व्हावा असा राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहेत. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सभास्थळी पंतप्रधान कोणत्या मार्गाने येणार व अन्य बाबीचे नियोजन सुरू आहे. समृध्दी महामार्गाचा प्रारंभ पॉईंट शहरा बाहेर शिवमडका येथे आहे. हा भाग हिंगणा तालुक्यात येतो. लोकार्पण कार्यक्रम महामार्गावरील वायफळ या गावाजवळ होणार आहे.

हेही वाचा: समृध्दी महामार्गाच्या पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हाती

शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा तालुक्यातील वायफळ या गावाजवळील कार्यक्रम स्थळाला भेट दिली. कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,व अन्य अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांनी काही सूचना केल्या. समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किमीचा लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतीमान होईल. एकूण १२० मीटर रुंदीचा हा सहा पदरी महामार्ग असणार आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 13:39 IST
Next Story
“शिवरायांचा जन्म कोकणात’ प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…