बुलढाणा : बातमीचे हेडिंग वाचून हजारो वाचक, ह्युवर्स चक्रावून जाने स्वाभाविक आहे.यात आश्चर्य होन्यासारखे काही नाही. पण हे खरे आहे. अर्थात केंद्रीय आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या समोर ‘हॉट सीट’वर बसले नव्हते,तर या लोकप्रिय मालिकेच्या एका भागात त्यांचा उल्लेख करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल, १७ फेब्रूवारी रोजी पार पडलेला भाग (इपिसोड) साधा शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री अशी मजल मारलेल्या या नेत्याच्या लाखो चाहत्यासाठी कौतुकाची बाब ठरला.तसेच बुलढाणा जिल्हा वासियासाठी अविस्मरणीय बाब ठरली. कर्तुत्वाला नेतृत्वाची साथ मिळाली तर नेतृत्व नावारूपाला येतं  हा  प्रत्यय १७ फेब्रूवारी रोजी प्रसारित “कोण बनेगा करोडपती निमित्त आला. या प्रश्नमंजुषा शो ” मध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा कारभार आहे? हा प्रश्न हॉट सीट वरील स्पर्धकाला  विचारण्यात आला होता.  यासाठी कोळसा, खान, जल शक्ति आणि आयुष असे चार पर्याय देण्यात आले होते.हा  भाग पाहणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील दर्शकाना यामुळे आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले प्रतापराव जाधव हे २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदार संघातुन सलग चौथ्यादा विजयी झाले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखालील केंद्रीय मंत्री मंडलात केंद्रीय आरोग्य, आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि  कुटुंब कल्याण मंत्री पद देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारस मुळे त्यांची वर्णी लागली.

मागील ९ जून २०२४ रोजी त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.  अनेक वर्षापासून देश विदेशात गाजणाऱ्या व लोकप्रियतेची शिखरे गाठनारया कौन बनेगा करोड़पती कार्यक्रमात   त्यांच्यावर प्रश्न विचारने म्हणजे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या जिल्ह्यातील हजारो चाहत्यातून उमटली आहे.

‘ही तर कामाची पावती’

आयुष मंत्रालयात गेल्या ९ महिन्यात  केलेल्या कामाची ही पावती असून बुलढाणेकरांसाठी ही गौरवाची बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यातून व्यक्त होत आहे .नऊ महिन्याच्या कार्यकर्तित आयुष मंत्रालयअंतर्गत विविध कार्यक्रम राबविले यामध्ये संविधानदिन २६ नोव्हेंबर ते २६ डिसेबर अटल बिहारी वाजपेयी यांच्या १००व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशामध्ये ‘देश का प्रकृती अभियान’ राबविण्यात आले . एक महिन्याच्या कालावधीत या अभियानांतर्गत एक कोटी पन्नास लाखाच्या जवळपास  नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले. याशिवाय आयुर्वेद ,युनानी ,योगा आयुष विभागार्गत देशातर्गत भरीव काम केल्या जात आहे त्यामुळेच सोनीवरील  लोकप्रिय ठरलेला प्रश्नमंजुषा शो अर्थात

 कोण बनेगा करोडपती या  कार्यक्रमात १७ फेबुवारीला  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा पदभार आहे हा प्रश्न अभिनेता अमिताभ बच्चन यांनी विचारला .बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्याची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली. ही बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांसाठी गौरवाची गोष्ट आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Questions about union minister prataprao jadhav in the program kaun banega crorepati scm 61 amy