बुलढाणा : काँग्रेस नेते तथा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वारंवार  पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील मतदारांचा जाहीर अवमान करीत आहे. जेंव्हा महाराष्ट्रामध्ये लोकसभेत त्यांना अडीच कोटी मते मिळाले तेव्हा ते कधीही बोलले नाही. तेंव्हा त्यांनी साळसूद मौन का बाळगले? असा सवाल भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे. शरद पवारांचे विधान बालिश असल्याचे सांगून लाडकी बहीण योजनातील अपात्र  लाभार्थ्यांची  चौकशी करण्यात येत असली तरी यात जाणीवपूर्वक कोणावर अन्याय होणार नाही अशी ग्वाहो देखील त्यांनी दिली.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील एका नागरी पतसंस्थेचे उदघाट्न महसूल मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बावनकुळे यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर मनमोकळी उत्तरे देताना राहुल गांधी, राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खरपूस टीका केली. लोकसभेत ३ जागा मिळाल्या तेव्हा मात्र राहुल गांधी काही बोलले नाहीत.

प्रत्येक वेळी मतदानाच्या वेळी मतदार यादी मध्ये आक्षेप घेण्याची वेळ असते. तेव्हा प्रत्येक बुथवर सर्वच पक्षाचे  एकेक एजंट  असतात. त्यांनी आक्षेप घ्यायचे असतात. तुम्ही  हरकत घेतली नाही. मतदार याद्यांवर नाही, मशीन सील करताना आक्षेप घेतला नाही घेतलं . आता मात्र मतदारांचा वारंवार अपमान करतायेत. ते निवडणूक हरल्यामुळे हे सर्व करीत असल्याचा  आरोप बावनकुळे यांनी केला. लवकरच  पालिकाची निवडणूक होणार आहे. महानगरपालिका निवडणूक देखील बोगस मतदारामुळे हरलो असे ते म्हणतील. बोगस मतदान झालं अन मतदान याद्या चुकीचे आहेत असे नेहमीप्रमाणे बोलतील.

पालिका निवडणुकीत महायुती ५१ टक्के मते घेऊन जिंकणार आहेत  असे भाकीत केले.स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आम्ही जिंकणार आहोत. येणाऱ्या सर्व निवडणुका महायुती जिंकणार आहे असा दावा त्यांनी बोलून दाखविला. यामुळे राहुल गांधींनी  मतदार यादी बोगस होती असे निकालनंतर न म्हणता आत्ताच मतदार याद्या तपासून घ्यावा अशी खिल्ली त्यांनी उडविली.राहुल गांधी महाराष्ट्रात देशात सर्वच निवडणुका हरणार हे निश्चित असे सांगून ते म्हणाले की, राहुल गांधींना देशाचं कुठलंही व्हिजन नसल्यामुळे विकासाची नाडी कळली नाही .यामुळे काँग्रेस पार्टी सोडून लोक  चाललेत.या परिणामी काँग्रेस पार्टी शून्य झाल्याशिवाय राहणार नाही असा दावा बावनकुळे यांनी बोलून दाखविला.

लाडकी बहीण मधील अपात्र लाभार्थ्यांची चौकशी करण्यात येत आहे. योजना लाडक्या बहिणी करता तयार केली. त्याच लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा असतो, चुकीचे लोक योजनेत घुसले. कुठलीही योजना असो कमी करायला लागतील. लाडक्या बहिणीसाठी देवा भाऊंनी योजना सुरू केली. त्यामध्ये जर माणसे आले असतील, मोठ्या प्रमाणात चुकीचे लोक आले असतील तर ते कमी केले गेल्या पाहिजे. मात्र युती शासन जाणीपूर्वक कोणाला कमी करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांच्या २८८ जागांपैकी १६० जागा जिंकण्याची हमी घेऊन दोघेजण आले होते या गौप्या स्फ़ोटची त्यांनी खिल्ली उडविली. यावर ते तेंव्हाच का नाही बोलले? शरद पवार जे आज बोलतायेत. शरद पवार ज्या दिवशी ते तुमच्याकडे आले त्या दिवशीच पोलीस तक्रार का नाही केली?  तुम्ही निवडणूक आयोग किंवा पोलिसात कंप्लेंट का केली नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित  केले. असे बालिशपणाचे विधान करणे शरद पवार साहेबांना निश्चितपणे शोभणार नाही. तुम्ही निवडणूक हरल्यावर तुमच्या पक्षात कोणी राहायला तयार नाही. तुमचं पूर्ण नेतृत्व उध्वस्त होत आहे, म्हणून अशी विधाने करणे चालू आहे असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

राहुल गांधींनी लोकसभेमध्ये खोटारडेपणा केला, लोकांनी ऐकला. आता पुन्हा खोटारडेपणा करताहेत. कारण बिहार निवडणूक ते हरणार आहेत.महाराष्ट्र पूर्ण हातातून जाणार आहेत, लोक सोडून चालले आहेत. नेते काही शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ५१ टक्के मते घेऊन जिंकणार आहेत.. महाराष्ट्रात चुकीचा नरेटिव्हे तयार करण्याकरिता अशा प्रकारचे विधाने करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगावरील प्रश्नाची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यायला हवी, भाजप उत्तर देत आहे या विरोधाकांच्या टीकावर ते म्हणाले की, निवडणूक आयोगाचे उत्तर जर मी देत असलो तर त्यांचा मी वकील  आहे. पन्नास वेळा निवडणूक आयोगाने त्यांना उत्तर दिले. पण मुळात गांधींनी खोटं बोल पण रेटून बोल, हे तत्व  स्वीकारलेलं आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.