अकोला : पुणे आणि हटियाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मनस्ताप व अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तांत्रिक कामामुळे हटिया-पुणे-हटिया एक्सप्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राउरकेला स्थानकातील ‘यार्ड इंटरलॉकिंग’ कामामुळे हटिया-पुणे- हटिया एक्सप्रेसची दोन्ही बाजूची फेरी रद्द करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबरला हटिया येथून सुटणारी गाडी क्र. २२८४६ हटिया-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी मंगळवारी दुपारी २.४० अकोला स्थानकावर येणार नाही. तसेच गाडी क्र. २२८४५ पुणे-हटिया एक्सप्रेस ११ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकावरून सुटणार नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.