बुलढाणा : सोयाबीन-कपाशीची दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीतर्फे आज पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला संग्रामपूर तालुक्यात उत्साही प्रतिसाद मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशकडे जाणारा अकोला-बऱ्हाणपूर महामार्ग रोखून धरला. यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या. शेतकरी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी कापूस-कांदे रस्त्यावर फेकून महामार्ग अडवला. शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, गाड्यांच्या लांब रांगा लागल्या असल्याने पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे यावेळी दिसून आले.

हेही वाचा – धक्कादायक! चक्क जीएमसीमध्ये आला जखमी अजगर; पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार

कापूस-सोयाबीनला भाववाढ, बोंडअळीमुक्त कपाशी बियाणे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ, रखडलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई, विमा कंपनीने रोखलेला पीक-विमा, कृषी पंपाला दिवसाला वीज व कृषी कनेक्शनवर वाढलेल्या भार समतोलासाठी नवीन रोहित्र वाढवणे, उसाला एकरकमी एफआरपी, प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम, नाफेडमार्फत शासकीय कांदा खरेदी, ‘लंपी स्किन’ ने मृत्यू पावलेल्या पशुमालकांना भरपाई व बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – वाशीम : सार्वजनिक बांधकाम विभागातील तो कॅरम बोर्ड कुणासाठी? कर्मचारी म्हणतात..

…तर मंत्र्यांच्या गाड्या फोडू

दरम्यान, यावेळी प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधीसोबत बोलताना केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कापूस-सोयाबीन-कांदा भाववाढ प्रश्नावर सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी अन्यथा अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या गाड्या फोडू, असा इशारा डिक्कर यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani road block at varvat bakal in buldhana for farmers demand scm 61 ssb