नागपूर: राज्यातील कमाल व किमान तापमानात घाट होत असल्यामुळे उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून सुटका झाली आहे. राज्यात हळूहळू गुलाबी थंडीला सुरुवात देखील झाली आहे. मात्र, असे असले तरी नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय हवामान खात्याने मंगळवारी नोव्हेंबर महिन्याचा अंदाज जाहीर केला. त्यामध्ये कमाल व किमान तापमानासह नोव्हेंबर महिन्यात देशातील पावसाची स्थिती कशी असेल याबाबत अंदाज देण्यात आला आहे. त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे.

हेही वाचा… मराठा आरक्षण आंदोलन: नागपूरमधील ‘एसटी’ची तीन हजार किलोमीटरची वाहतूक रद्द

किमान तापमानाबरोबर राज्यातील कमाल तापमानात सुद्धा सरासरीपेक्षा वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तर देशात मध्य भारत आणि अति उत्तरेकडील भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी नोंदले जाऊ शकते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The weather department has predicted that the cold will be less in the month of november in maharashtra rgc 76 dvr