लोकसत्ता टीम

नागपूर : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला एका वेगळ्या उंचीवर नेले, पण त्यांचे उत्तराधिकाऱ्यांनी मात्र वेगळी वाट धरत हिंदुत्वाचा ऱ्हास करीत आहेत, हे लज्जास्पद आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा शाखेचे महामंत्री गोविंद शेंडे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता येथे केली.

नागपूरमध्ये वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून होणाऱ्या टीकेच्या अनुषंगाने शेंडे यांना विचारले असता ते म्हणाले, दिंवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला एका उंचीवर नेले होते. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी मात्र वेगळी वाट धरली आहे, याची खंत वाटते. ते हिंदुत्वाचा ऱ्हास करीत आहे, हे लज्जास्पद आहे. शंकराचार्यांना आम्ही निमंत्रण दिले आहे. आमचे काम निमंत्रण देणे आहे, ते त्यांनी स्वीकारायचे किंवा नाही ते त्यांचे काम आहे. मात्र आम्ही त्यांची वाट पाहू, त्यांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही, असे शेंडे म्हणाले. शंकराचार्यांनी विरोध करण्याचे कारण नाही, रामंमंदिर लोकार्पणाचा मुहूर्त हा विचारपूर्वकच ठरवण्यात आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आणखी वाचा-नागपूर : धरमपेठकडे जायचे… घराबाहेर पडताना हे रस्ते टाळा, वाहतुक कोंडीत अडकण्याची शक्यता

सात हजार अतिविशेष मान्यवरांचा निमंत्रितांमध्ये सहभाग आहे. त्यापैकी चार हजार साधू संत आहे. राम मंदिराच्या उदघाटनाच्या तिथीला घेऊन काही लोक विरोध करत आहे. मात्र, तज्ज्ञ लोकांनी बसून ही तिथी काढल्याची माहिती त्यांनी दिली.