नागपूर : डीपफेक गुन्हेगारीचा राज्यभरात धोका निर्माण झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपी किंवा प्रोफाईलवरील छायाचित्र वापरून डीपफेक केले जात आहे. महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब कर्नाटक, केरळ आणि चेन्नईसह अन्य राज्यातही डीपफेकच्या तक्रारी दाखल होत आहेत. यामध्ये मोठमोठ्या अभिनेत्रींसह राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. बदल्याच्या भावनेतून किंवा सूड उगविण्यासाठी डीपफेकचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाने याबाबत जनजागृती करणे सुरू केले आहे. डीपफेक चित्रफितींमध्ये मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. समाजात बदनामी करणे एवढाच उद्देश डीपफेकमागे असतो. याप्रकरणी पुणे, मुंबई आणि नागपुरात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. केवळ सूड घेण्याच्या किंवा बदनामी करण्याच्या उद्देशाने छायाचित्राशी छेडछाड केल्याची कबुली जवळपास सर्वच आरोपींनी दिली, असा दावा पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा – विधानसभा निवडणूक निकाल, फडणवीस यांची प्रतिक्रिया म्हणाले…

खाते ‘लॉक’ करा

नागरिकांनी आपले फेसबुक, इन्स्टाग्राम खाते ‘लॉक’ करावे. समाजमाध्यमांवर छायाचित्र टाकताना तेदेखील ‘लॉक’ करावे किंवा त्या बाबतीत गुप्तता बाळगावी. अज्ञात व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – बनावट नोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेची यवतमाळात कारवाई; आर्णी तालुक्यातून संशयितास ताब्यात घेतले

डीपफेक हा सायबर गुन्हा आहे. नागरिकांनी आपली खासगी माहिती, छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकताना सतर्क राहावे. असा प्रकार कुणासोबत घडल्यास लगेच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. – अर्चित चांडक, पोलीस उपायुक्त, सायबर क्राईम, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of dp profile photographs for deepfakes alert from state cyber crime department adk 83 ssb
Show comments