यवतमाळ: देशांतर्गत चालणाऱ्या बनावट नोटांचे धागेदोरे यवतमाळात असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी आर्णी तालुक्यात कारवाई केल्याने खळबळ उडाली.

मुंबई येथील एनआयएच्या पथकाने शनिवारी पहाटे आर्णी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे धाड टाकली. तेथून उत्तम भीमराव चव्हाण याला ताब्यात घेतले. यावेळी काही महत्वाचा पुरावाही एनआयए पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा… विधानसभा निवडणूक निकाल, फडणवीस यांची प्रतिक्रिया म्हणाले…

एनआयएच्या दिल्ली कार्यालयातून देशभर बनावट नोटा विरोधात धाडसत्र राबविण्यात आले. चार राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. महाराष्ट्रात यवतमाळसह कोल्हापूर जिल्ह्यात धाड घालण्यात आली. कोल्हापूरमधून संशयित राहुल तानाजी पाटील याला ताब्यात घेण्यात आले. आर्णी येथे राष्ट्रीय तपास यंत्रणेला आर्णी पोलिसांनी मदत केली. याच प्रकरणात एनआयएने उत्तरप्रदेशातील शहाजापूर जिल्ह्यातून विवेक ठाकूर, आदित्य सिंग, बल्लारी जिल्ह्यातील महेंद्र यांनाही ताब्यात घेतले आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून १००, ५००, २०० अशा बनावट चलनी नोटा तयार करून त्याचे देशांतर्गत वितरण केले जात होते, असा आरोप आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.स्थानिक पोलिसांनी ब्राम्हणवाडा येथील कारवाईबाबत दुजोरा दिला.

बनावट नोटांचा निवडणुकीत वापर?

नुकत्याच झालेल्या छत्तीसगड, तेलंगणा आदी राज्यात झालेल्या निवडणुकीत या बनावट नोटांचे वितरण केल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेस संशय आहे. या बनावट नोटा तयार करण्यासाठी देशाच्या सीमावर्ती राज्यातून साहित्य आणले जात होते. यवतमाळ जिल्ह्यातील संशयित उत्तम चव्हाण हा इतर साथीदारांच्या मदतीने देशात या बनावट नोटा पुरवीत असावा असा संशय आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एनएआयने प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले.

Story img Loader