Premium

वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले, “भागवत आणि मोदींवर टीका करणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये…”

कारागृहात जाणे पसंद करील पण भाजपात जाणार नाही, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar criticizes Nitesh Rane
वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले, "भागवत आणि मोदींवर टीका करणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये…" (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची हाफ पँट व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. त्यांनीच आतापर्यंत तीन वेळा पक्ष बदल केला आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केली. कारागृहात जाणे पसंद करील पण भाजपात जाणार नाही, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा वडेट्टीवार यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार नितेश राणे यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केल्यानंतर वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. नारायण राणे व त्यांच्या सुपुत्राने आतापर्यंत तीन वेळा पक्ष बदल केला आहे. मी कुठेही जाणार नाही. त्यामुळेच काँग्रेस श्रेष्ठींनी विश्वास दाखविला. काँग्रेस नेत्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. नारायण राणे यांच्यासोबत मी काँग्रेस पक्षात आलो. तेव्हा राणे यांची भूमिका वेगळी होती. आता राणे यांची भूमिका वेगळी आहे. दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उडविण्यापेक्षा पहिल्यांदा नितेश राणे यांनी मंत्री व्हावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – महाराष्ट्रात रेल्वेच्या सांडपाण्याची अशी होणार विल्हेवाट, वाचा…

हेही वाचा – सिनेस्टाईल थरार: दरोड्याच्या तयारीत असलेले १० दरोडेखोर जेरबंद; १३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजपा हा वापर करून घेणारा व फेकून देणारा पक्ष आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. भाजपा पंकजा मुंडे यांचेही तेच करत आहे. त्यामुळेच त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई झाली, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay wadettiwar criticizes nitesh rane he also said that he would like to go to jail but would not go to bjp rsj 74 ssb

First published on: 27-09-2023 at 17:34 IST
Next Story
…अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने दुकानाच्या पाट्या उतरवू, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढेंचा इशारा