नागपूर : फडणवीस यांच्याविरोधात लढण्यास कॉंग्रेसकडून कोणीही तयार नव्हते तेव्हा मी लढलो, माझ्या कुटुंबाच्या रक्तात कॉंग्रेस आहे, असे कॉंग्रेसमधून निष्कासित माजी आमदार आशीष देशमुख यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशमुख यांनी एक निवेदन प्रसिध्दीला दिले आहे. त्यात ते म्हणतात, माझ्या कुटुंबाच्या रक्तात कॉंग्रेस आहे. माझा जन्म होण्याच्या आधीपासून कॉंग्रेसशी आमचे नाते आहे, तसे संस्कार आमच्यावर झाले आहेत. भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये परत आलो. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढण्यास कॉंग्रेसकडून कोणी तयार नव्हते. तेव्हा सोनिया गांधी यानी मला दिल्लीला बोलावून घेतले. आणि  तुम्ही फडणवीसांच्या विरोधात लढा. असे सांगितले.

मी संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविली. लढतीत फडणवीस यांचे मताधिक्य मी कमी करू शकलो. नागपूरमधील कॉंग्रेसच्या लाथाळ्या जगजाहीर आहेत. माझ्या दिमतीला कोणीही नसतांना एकहाती लढत मी फडणवीसांना दिलीदिली, असे देशमुख यांनी निवेदनात नमुद केले. पुढे काय करायचे हे मी कार्यकर्ते आणि सहकार्यांशी चर्चा करून ठरवणार आहे. पक्षातून बडतर्फीच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागायची का, हे ठरवावे लागेल. एखाद्या पक्षाच्या संविधानाला न्यायालयात आव्हान देता येते, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When no one was ready to fight against devendra fadanvis said ashish deshmukh congress expelled rbt 74 ysh