धुळे : नाशिक पाठोपाठ आता धुळे पोलिसांनीही शहरातील टवाळखोरांना त्यांच्याकडील ‘सुगंधी उटण्याने’ न्हाऊ घातले आणि खास फटाक्यांची भेटही दिली. यामुळे ‘आम्हाला क्षमा करा, यानंतर अशी चूक होणार नाही’ अशा शब्दात माफी मागणारे टवाळखोर हात जोडून गयावया करीत आहेत.

पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात सजवलेल्या गल्ली – बोळात धिंगाना घालणाऱ्या दारुड्यांचा त्तास कमी होणार असल्याने  सामान्य नागरिकांनी या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

शहरातील निर्मनुष्य भागात, मैदानावर, झाडाझुडूपांच्या आडोशाला, नदी – नाल्याकाठी, रस्त्याच्या काठावर किंवा अन्य ठिकाणी अनेक टवाळखोर दारूच्या बाटल्या रिकाम्या करतात. सोबत पाण्याची बाटली आणि अन्य खाद्य पदार्थ आणून बिनधास्त बैठक मारतात आणि कधी आरडाओरड तर कधी जोरजोरात एक दुसऱ्याशी बोलत दारू रिचवितात. दरम्यान, समोरून जाणाऱ्या- येणाऱ्यांना चिडविणे, महिला किंवा युवतींना पाहून काहीतरी डायलॉगबाजी करणे किंवा कुरबुर करणे असे प्रकार घडतात. अशा वरवर किरकोळ वाटणाऱ्या घटना कधीतरी मोठ्या घटनेत परावर्तीत झाल्याची अनेक उदाहरणे असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा प्रकार शक्य तेवढा मोडून काढण्यासाठी प्रथम टवाळखोरांना लक्ष्य केले आहे.

अनेक ठिकाणी अचानक पोलीस पथक पाठवून काल सायंकाळनंतर  अचानक टवाळखोरांना दारू पिताना पकडले आणि त्यांच्या सोबत ‘वसूबारस’ साजरी केली. दारू पितांना जे कुणी पोलिसांना सापडले त्यांना त्याच जागी किंवा चारचौघात आणून उठाबशा घालणे, कान धरून माफी मागणे किंवा यानंतर अशी चूक यापुढे कधीही होणार नाही असे वदवून घेण्यात आले. एवढेच नाही, तर अशा युवकांपैकी संभाव्य गुन्हेगारीकडे वळणाऱ्यां अनेकांचे छायाचित्रे आणि चित्रीफीत तयार करून  समाज माध्यमांवरून प्रसारित झाल्याने अनेकांच्या नातेवाईकांनी,

मित्रांनी आणि कुटुंबियांनी पाहिले. ही बाब लज्जास्पद वाटल्याने पोलिसांच्या हाती लागलेल्या टवाळखोरांपैकी अनेकांनी अशी वेळ आपल्यावर पुन्हा कधी यायला नको असे म्हणत आतापासूनच दारूपासून चारहात दूर राहणे पसंत केल्याची कबुलीही सगळ्यांसमोर दिली.

पोलिसांनी ऐन दिवाळीत अशी मोहीम उघडल्याने रोज अनेक ठिकाणी सायंकाळनंतर सुरु होणारा बेवड्यांचा त्रास कमी होण्याची आशा सामान्यजणांनी व्यक्त केली आहे. दारू पिताना पोलिसांना सापडलेल्या मुलांच्या कुटुंबियांनी आणि गल्लीतील रहिवाशांनीतर  अचानक झालेल्या या कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांचे आभार मानले आहेत. यामुळे किमान वर्षातून एकदा येणारा दिवाळी सण तरी आनं