नाशिक : शहरातील आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयातील बैठक झाल्यानंतर रात्री मोर्चेकऱ्यांना सोडण्यासाठी निघालेले पोलीस वाहन मुंबई-आग्रा महामार्गावर दुभाजकावर धडकून १५ जण जखमी झाले. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. सर्व जखमींना आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी संघटनेच्या वतीने बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे. सोमवारी मोर्चेकरी नाशिकच्या वेशीवर म्हणजे आडगाव ट्रक टर्मिनल परिसरात धडकले. या परिसरात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. या दिवशी मोर्चेकऱ्यांची आदिवासी विकास मंत्री शहरातील आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयातील बैठक झाल्यानंतर रात्री मोर्चेकऱ्यांना सोडण्यासाठी निघालेले पोलीस वाहन मुंबई-आग्रा महामार्गावर दुभाजकावर धडकून १५ जण जखमी झाले. शहरातील आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयातील बैठक झाल्यानंतर रात्री मोर्चेकऱ्यांना सोडण्यासाठी निघालेले पोलीस वाहन मुंबई-आग्रा महामार्गावर दुभाजकावर धडकून १५ जण जखमी झाले.

शहरातील आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयातील बैठक झाल्यानंतर रात्री मोर्चेकऱ्यांना सोडण्यासाठी निघालेले पोलीस वाहन मुंबई-आग्रा महामार्गावर दुभाजकावर धडकून १५ जण जखमी झाले. या दिवशी मोर्चेकऱ्यांची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी चर्चा केली. रात्री आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयात पुन्हा चर्चेची फेरी पार पडली. ही बैठक झाल्यानंतर चर्चेसाठी आलेल्या शिष्टमंडळातील काही युवकांना महामार्गालगतच्या मंगल कार्यालयात सोडायचे होते. त्यांनी पोलिसांना तिथे सोडण्याची विनंती केली. मोर्चेकऱ्यांना घेऊन निघालेले पोलिसांचे वाहन रात्री अपघातग्रस्त झाल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले. अपघातात १५ जण जखमी झाले. रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी आपण चर्चा केली. प्राथमिक उपचार करून १० जखमींना लवकर सोडण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे बनसोड यांनी सांगितले. दरम्यान, सेवा रस्त्यावरून उड्डाण पुलावर जाणाऱ्या मार्गावरील दुभाजकावर हे वाहन धडकल्याचे सांगितले जाते.

प्राथमिक उपचारानंतर ११ जणांना सोडले

अपघातात जखमी झालेल्या १५ जणांना आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात ज्ञानदेव जोपाळे या पोलीस वाहनावरील चालकाचा समावेश आहे. तर हितेश बारसी, सुबोध बोंबले, छोटालाल अंबरवाडे, विनोद माहुतकर, कुशाल जैसवाल, अविनाश हेंगाडे, तुकाराम बारेला, राहुल बोरसे, भाई हरवते, सिद्धार्थ सुरेमाड, उत्तम चव्हाण, प्रवीण चौरे, मनिष जुंबाडे आणि प्रमोद हे मोर्चेकरी होते. ११ जण किरकोळ जखमी होते. प्राथमिक उपचारानंतर रात्री त्यांना सोडण्यात आले. तर उर्वरित चार जखमींना मुका मार लागला आहे. त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.