नाशिक : शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणुकीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध मंडळांनी सहभाग घेतला आहे. मिरवणूक हळूहळू पुढे सरकत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरवणुकीला प्रारंभ झाला, त्यावेळी आमदार प्रा.देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, यांच्यास‍ह मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी भुसे यांनी मंडळांना केले.

हेही वाचा : जळगाव शहर बससेवेचा मार्ग मोकळा, जुन्या स्थानकाची जागा देण्यास एसटीची तत्त्वतः मान्यता

सुरुवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून पालकमंत्री भुसे यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. मिरवणुकीत शिवसेना मंडळाने केरळमधील लोककला पथक आणले असून या पथकाचे नृत्य मिरवणुकीतील आकर्षण ठरले आहे

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik guardian minister dada bhuse participated in ganesh visarjan 2023 css