लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्याप्रमाणे बॉम्बने उडवून देण्याचा कट रचला जात असल्याचा निनावी दूरध्वनी नाशिक पोलिसांना आला आणि एकच खळबळ उडाली. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. तपासात केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी एका विक्षिप्त माणसाने हा दूरध्वनी केल्याचे उघड झाले.

आणखी वाचा-तहानलेल्या बिबट्याने हंड्यात मान टाकली आणि पुढे…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्यावर हल्ला होईल. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणे त्यांना बॉम्बहल्ल्यात उडवले जाईल, अशी धमकी नाशिक पोलिसांना दूरध्वनीद्वारे एका निनावी व्यक्तीने दिली. त्यानंतर पोलिसांनी गृह विभागाला तशी माहिती दिली. या निनावी व्यक्तीचा शोध घेतला असता श्रीराम जोशी (५३, रा. नाशिक) यांनी हा दूरध्वनी केल्याचे उघड झाले. जोशी हे काही दिवस इंग्लड येथे वास्तव्यास होते. २००० साली घटस्फोट झाल्यानंतर त्यांना नैराश्य आले. या काळात ते दारूच्या आहारी गेले. मध्यंतरी हे प्रमाण कमी झाले होते. मात्र मुंबई येथून परतल्यावर पुन्हा त्यांनी मद्यपान सुरू केले. दारूच्या नशेतच त्यांनी नाशिक पोलिसांना दूरध्वनी केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत बच्छाव यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik police got in trouble because phone of crazy person mrj