नवी मुंबई : डिझेल कडे दुर्लक्ष देणे पडले महागात ; वाहतूक कोंडी म्हणून गुन्हा वर ओव्हरलोड म्हणून ३० हजारांचा दंड | A case has been filed against the truck driver due to the traffic jam amy 95 | Loksatta

नवी मुंबई : डिझेल कडे दुर्लक्ष देणे पडले महागात ; वाहतूक कोंडी म्हणून गुन्हा वर ओव्हरलोड म्हणून ३० हजारांचा दंड

शनिवारी सकाळी साडे नउच्या सुमारास शीव पनवेल मार्गावर डीझेल संपल्याने एक डंपर बंद पडला.

नवी मुंबई : डिझेल कडे दुर्लक्ष देणे पडले महागात ; वाहतूक कोंडी म्हणून गुन्हा वर ओव्हरलोड म्हणून ३० हजारांचा दंड
( संग्रहित छायचित्र )

शनिवारी सकाळी साडे नउच्या सुमारास शीव पनवेल मार्गावर डीझेल संपल्याने एक डंपर बंद पडला.त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीने ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात ट्रक क्षमतेपेक्षा जास्त वजन वहन करत असल्याचे लक्षात आल्याने ३० हजार रुपयांचा दंड बसलाच शिवाय ९० दिवसांच्या साठी वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : दोन जेष्ठांच्या घरात चोरी, बँक लॉकरची किल्लीही चोरट्यांनी नेली

आपल्या वाहनात इंधन किती आहे याचा अंदाज न आल्याने एका ट्रक चालकाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. शनिवारी सकाळी हाशीम पटेल यांचा डंपर (एमएच ४६ बी यु ४८४८ ) चालक अनिल मसुरकर हा चालक नवी मुंबई नियोजित विमानतळ येथून दगड घेऊन खारघर येथे घेऊन जात होता.सीबीडी येथील उड्डाण पुलावर पुणे मार्गिकेवर हा डंपर बंद पडला. त्यामुळे सुमारे तीन किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या व प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली. तांत्रिक बिघाड झाल्याने डंपर बंद पडला असेल म्हणून वाहतूक पोलिसांनी सदर डंपर बाजूला  घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र वाहन चालक याने डंपर डिझेल संपल्याने बंद पडल्याचे सांगितल्यावर वाहतूक पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला. हि वाहतूक कोंडी सोडवण्यास सुमारे दोन तास गेले. त्यामुळे पोलिसांनी वाहन चालकाच्या विरोधात निष्काळजी पणाने वाहन चालवण्याने वाहतूक कोंडीस कारण ठरला म्हणून गुन्हा दाखल केला. यावेळी डंपर मध्ये मोठ्या प्रमाणात दगड असल्याचे लक्षात आल्याने वजन तपासण्यात आले. त्यावेळी क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने.३० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ९० दिवस परवाना रद्द करण्याची निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> उरण : सिडकोने विकासाच्या नावाने शेतकऱ्यांना नेस्तनाबूत केले ,ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांचे गावठाण हक्क परिषदेत प्रतिपादन

जगदीश शेलकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग) शीव पनवेल मार्गावर बेशिस्तीने वाहन चालवल्याने वाहतूक कोंडी होत असून वाहतूक नियमांची पायमल्ली करून बेजावादारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात वेळोवेळी कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालकांनी सहकार्य करावे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई : दोन जेष्ठांच्या घरात चोरी, बँक लॉकरची किल्लीही चोरट्यांनी नेली

संबंधित बातम्या

पनवेल: कर्णकर्कश आवाजाचे ४७ सायलेन्सर नष्ट
नवी मुंबईतील माजी नगरसेवकावर फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून डॉ. रोहित शिंदे बाहेर; इतर स्पर्धक झाले भावुक
पुणे: अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सासू-सुनेला अटक; २० किलो गांजा जप्त
‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून ‘हे’ वाईल्ड कार्ड स्पर्धक बाहेर; नेमकं कारण काय?
‘छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची चुकीची विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’; खासदार श्रीकांत शिंदे यांचा इशारा
FIFA WC 2022: किलर किलियन! फ्रान्सची नवव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, पोलंडची झुंज अपयशी