उत्तरप्रदेश येथील प्रतापगढ  मध्ये आपसी वादातून एका व्यक्तीची हत्या करून चार आरोपी पळून गेले होते. हे चार आरोपी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात खारघर येथे लपून बसल्याची माहिती समोर आली होती. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत चारही आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई : द्राक्ष हंगाम सुरू होण्याला महिना लागणार; घाऊक बाजारात द्राक्ष प्रतिकिलो ६०-१००रुपयांवर

इम्रान असीर खान, वय ३० वर्षे, व्यवसाय नोकरी, मोहम्मद सलमान असीर खान, वय २९ वर्षे, चालक,  गुफारान असीर खान, वय २० वर्षे, चालक आणि मोहम्मद मुजीद इब्रार अली, वय २२ वर्षे, चालक असे अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात देल्हूपूर पोलीस ठाणे, जिल्हा प्रतापगढ, राज्य उत्तरप्रदेश येथे हत्येचा गुन्हा नोंद आहे. 

यातील फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पुर्वीपासून वाद होते. १२ डिसेंबरला संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ रकिब व भाचा असफाक मोटर सायकलवरून देल्हूपूर बाजारातून घरी जात असताना आरोपींनी हातात लाठ्याकाठ्या, लोखंडी सळई घेवून फिर्यादी यांचा भाऊ व भाचा यांना जिवे ठार मारण्याचे उददेशाने आरोपी यांनी अगोदर कारने रकिब व असफाक यांचे मोटर सायकलला ठोकर मारून त्यांना खाली पाडून हातातील लाठ्याकाठ्या व लोखंडी सळईने त्यांना मारहाण केली. तसेच आरोपींनी त्यांचे हातातील अग्निशस्त्राने जखमींवर फायर करून त्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती केल्या व शिविगाळी करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून तेथून पळून गेले. गुन्हयातील जखमी रकिब हा उपचारादरम्यान १६ जानेवारीला मयत झाला. 

हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली – केसरकर

या गुन्हयातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाल्याने व त्यातील चार आरोपी हे नवी मुंबई परीसरात वास्तव्यास असल्याबाबत माहिती समोर आली. सदर आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त,  मिलींद भारांबे,  अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), विजय काळे यांनी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे),विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या वेगवेगळया टिम तयार करून आरोपींचा सर्वोतोपरी शोध सुरू करण्यात आला.

गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही दिवसांपासून वर नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हयातील आरोपी हे खारघर, नवी मुंबई परिसरात असल्याबाबत गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक प्राप्त केली. सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सेक्टर ८, खारघर येथे जावून सापळा लावून सदरचे आरोपी हे खारघर येथुन पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यांना शिताफिने ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा- पनवेलः शाळेच्या निष्काळजीपणाविरोधात पालकाने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला

सदरची उत्कृष्ट कारवाई नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, . संदिप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, वैभवकुमार रोंगे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर वाघ, मधुकर गडगे,  सचिन पवार, अनिल पाटील, प्रशांत काटकर, रमेश शिंदे, रणजित पाटील, अजित पाटील, निलेश पाटील,  रूपेश पाटील,  इंद्रजित कानु,  दिपक डोंगरे,  सागर रसाळ, राहुल पवार,  आजिनाथ फुंदे, प्रफुल्ल मोरे, पोलीस शिपाई संजय पाटील, प्रविण भोपी, विकांत माळ, अभय मौ-या, नंदकुमार ढगे यांनी केली आहे.

रवींद्र पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) वरिष्ठांचे आदेशाने  नमुद आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी देल्हूपुर पोलीस ठाणे, उत्तरप्रदेश येथील पोलीस उप निरीक्षक, राकेश चौरसीया व पोलीस पथकाचे ताब्यात देण्यात आले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four accused who were hiding in navi mumbai after killing in uttar pradesh arrested dpj