सलग सुट्ट्या आणि खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भुषण सोहळ्यासाठी मुंबई गोवा महामार्गासह, मुंबई पुणे दृतगती मार्ग आणि मुंबई पुणे जुना महामार्ग यावर तीन दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे शासन आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खारघर येथे जेष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून १८ लाख श्री सदस्य दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सलग सुट्ट्या आल्याने महामार्गावरील वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या तीनही महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १४ एप्रिलला रात्री १२ ते १६ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. १६ टन आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांसाठी ही बंदी लागू राहणार आहे. या कालावधीत मल्टी एक्सल व्हेईकल, ट्रेलर, ट्रक आणि रेती आणि खनिज वाहतूक डंपर चालविता येणार नाहीत.

हेही वाचा… पनवेलमध्ये शनिवारी सर्व शाळा बंद

हेही वाचा… Maharashtra Live News : “माझ्या भीतीने भाजपावाले…”, संजय राऊत यांचं नागपुरात विधान

दुध, भाजीपाला. औषधे, लिक्वीड ऑक्सिजन, गॅस वाहतुक, तसेच जिवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी ही बंदी लागू राहणार नाही. त्याच बरोबर रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्याची वाहतुक करणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही. मात्र त्यासाठी महामार्ग पोलीसांकडून प्रवेशपत्र घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाने अप्पर जिल्हा दंडाधिकारी रायगड यांच्या पत्रानुसार जारी केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy vehicles banned on highways around three highways of panvel because of maharashtra bhushan programe asj